आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लीक झाले मोटो X Gen 3 चे फोटो, फ्रंट कॅमेऱ्यासोबत राहणार फ्लॅश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
28 जुलै रोजी मोटोरोला कंपनी मोटो G थर्ट जनरेशन लॉंच करणार आहे. याची चर्चा सुरु असताना मोटो X Gen 3 चे फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये मोटोरोला कंपनीने फ्लॅगशिप फोन ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात लॉंच केले आहेत. यावर्षीही काही असेच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोटोरोलाचा पुढील फ्लॅगशिप फोन मोटो X Gen 3 राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मोटो X Gen 3 चे फोटो पेरुवियन फेसबुक पेज ‘Perú Android’ वर लीक झाले आहेत. अनेक सूत्रांकडून हे फोटो कलेक्ट केले असल्याचे या फेसबुक पेजच्या ओनरने सांगितले आहे.
काय आहे खास-
याच्या फ्रंट कॅमेऱ्यासोबत फ्लॅश राहणार आहे. फ्रंट फेसिंग फ्लॅश असल्याने फोटोची क्वालिटी चांगली असेल. यात फिंगरप्रिंट सेन्सरही राहणार आहे. हा फोन 2K डिस्लेसोबत येणार आहे. यात 21 मेगापिक्सलचा कॅमेरा राहणार आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, सोशल मीडियावर लीक झालेले मोटो X Gen 3 चे फोटो....