आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • नेपाळ भूकंप: पीडितांच्या माहितीसाठी गुगल आणि फेसबुकने सुरू केली नवीन सर्व्हिस

नेपाळ भूकंप: पीडितांच्या माहितीसाठी गुगल आणि फेसबुकने सुरू केली नवीन सर्व्हिस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क: नेपाळमध्ये शनिवारी झालेल्या भूकंपामुळे मृतांची संख्या 2500 च्या वर गेली आहे. मात्र नेपाळच्या गृहमंत्रालयाकडून आतापर्यंत 1950 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ही संख्या अजून वाढू शकते असा अंदाजही वर्तवला गेला आहे. नेपाळच्या स्थानिक माध्यमांनुसार ग्रामीण भागात राडारोड्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार केवळ काठमांडूतच 721 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच आपल्या नातेवाईकांच्या शोधात अनेकजण इकडे तिकडे भटकत आहे. त्यामुळेच या दुर्घटनेत हरवणाऱ्यांना शोधण्यासाठी जगप्रसिध्द सर्च इंजिन गुगलने एक पर्सनल फाईंडर सर्व्हिस लॉन्च केली आहे.

या सर्व्हिसच्या साह्याने भूकंपानंतर हरवलेल्या लोकांबद्दलची माहिती मिळवता आणि शेअर करता येते.
गूगल पर्सन फाइंडर सर्व्हिस :
गूगलच्या या पर्सन फाइंडर सर्विसने तुम्ही तुमच्या नातेवाईकांना शोधू शकता. सोबतच तुमच्याकडे एखाद्या व्यक्तीची माहिती असेल तर ती शेअरही करू शकता. जर तुमच्याजवळ एखाद्या पीडिताबद्दलची माहिती असेल तर वर दाखवल्याप्रमाणे डाव्या बाजूला असलेल्या निळ्या बॉक्समध्ये त्याची माहिती टाका आणि जर तुम्हाला या भूकंपानंतर हरवलेल्या व्यक्तीबद्दल माहिती हवी असल्यास, तेव्हा तुम्ही हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये त्याचे नाव लिहा. सर्च केल्यावर लगेचच डेटाबेसमधून या नावाच्या व्यक्तीची माहिती तुमच्यासमोर येईल. यामुळे तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचा शोध घेणे सोपे जाईल.

या सुविधेचा वापर करण्यासाठी येथे क्लिक करा..
हा डाटा केवढा अचूक आहे, हे युजरवरसुध्दा अवलंबून आहे. कारण तो जशी माहिती यामध्ये भरेल, तिच माहिती लोकांना मिळेल. गुगलने दिलेल्या माहितीनुसार तो या माहितीची तपासणी आणि त्यातील अचूकता तपासू शकत नाही.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या फेसबुकने सुरू केलेली सुविधा...