आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन ओएस विंडोज १० मोफत अपग्रेड करता येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - मायक्रोसॉफ्टने बहुप्रतीक्षित विंडोज १० ही ऑपरेटिंग सिस्टिम बुधवारी भारतासह जगभरात लाँच केली. आधीपासून विंडोज ७, ८ किंवा ८.१ ओएस इन्स्टाॅल असलेल्यांना विंडोज १० मोफत अपग्रेड करता येईल.

१९० देशांत कॉम्प्युटरवर व टॅब्लेट्सवर विंडोज १० उपलब्ध झाली आहे. विंडोज १० मध्ये कोर्टाना, एक्सबॉक्स अॅप व मायक्रोसॉफ्टचे एज ब्राऊझर या प्रमुख सुविधा आहेत.
जगभरात तब्बल दीड अब्ज लोकांकडून विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम वापरली जाते. विंडोज १० मध्ये जुन्या इंटरनेट एक्सप्लोररऐवजी एज हा नवीन ब्राऊझर आहे. सर्वात आधी नाेंदणी करणा-या ५० लाख युजर्सना सर्वात प्रथम डाऊनलोडिंगची संधी मिळेल.

विंडोज १० मोफत का : विंडोज ८ पूर्णपणे फेल ठरली होती. यामुळे युजर्सची संख्या घटली. यानंतर कंपनी युजर्सना ६ वर्षे जुन्या विंडोज ७ चा अनुभव देण्याची तयारी सुरू केली. ती मोफत देऊन आपल्या युजर्सची संख्या वाढवण्याची योजना आहे.