आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्स रिटेल लाइफ ब्रँडच्या ‘अर्थ २’ फोनमध्ये आवाजावर कंट्रोल होणारा कॅमेरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिलायन्स रिटेलने मंगळवारी लाइफ (एलवायएफ) मधील नवा स्मार्टफोन “अर्थ २’ बाजारात दाखल केला. लाइफ ब्रँडचा हा दुसरा अल्ट्रा-प्रीमियम फोन आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या फोनमध्ये आवाजाने कंट्रोल होणारा कॅमेरा आहे. समोरील आणि मागील दोन्ही बाजूंचे कॅमेरे १३ एमपीचे आहेत. मागील बाजूच्या रिअर कॅमेऱ्यामध्ये लेजर ऑटो फोकसची सुविधा असून यामुळे फक्त ०.१ सेकंदातच फोकस करता येणार आहे. अॅल्युमिनियम एलॉय बाॅडी असणाऱ्या या फाेनची पाच इंचाची स्क्रीन आहे. यामध्ये तीन सिक्युरिटी फीचर्सदेखील आहेत. पिन, रेटिना लॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सरचा यात समावेश आहे. गॅलरीलादेखील लॉक करण्याची सुविधा आहे.

अर्थ-२ हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ऑक्टाकोर प्रोसेसर, जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल मेमरी असणारा फोन आहे. याच्या बॅटरची २५०० एमएएचची क्षमता असून हा चार रंगांमध्ये बाजारात उपलब्ध झाला आहे. यात काळा, पांढरा, हिरवा आणि सोनेरी (गोल्ड) या रंगांचा समावेश आहे. अर्थ-२ मध्ये सर्वच नवीन फीचर्स देण्यात आले असल्याचे रिलायन्स रिटेलचे अध्यक्ष (डिव्हाइस) सुनील दत्त यांनी सांगितले. यामुळे या फोनमधून ग्राहकांना डिजिटलचा वास्तविक अनुभव घेता येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...