आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू Nokia 3310 मध्ये असू शकतो कॅमेरा; फीचर्स आणि फोटो झाले LEAK

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2017 मध्ये (MWC) आज 17 वर्षे जुना Nokia 3310 री-लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीने हा फोन सप्टेंबर 2000 मध्ये लॉन्च केला होता.  दुसरीकडे, या फोनच्या लॉन्चिंग आधीच सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल झाला आहे. Concept creator ने हा व्हिडिओ बनवला आहे. त्यात न्यू Nokia 3310 चे फीचर्स दाखवण्यात आले आहेत.

Nokia 3310 मध्ये असू शकतो कॅमेरा...
- व्हिडिओमध्ये Nokia 3310 चे मॉडेल आणि फीचर्स दाखवण्यात आले आहे. न्यू 3310 हँडसेटमध्ये कॅमेरा असेल. त्यात यूजर फोटोसोबत व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकेल. मात्र, कॅमेरा किती मेगापिक्सलचा असेल, याबाबत माहिती देण्यात आली नाही. 
- फोनला 1.5 इंचाचा डिस्प्ले स्क्रीन असेल. यासोबत FM सोबत 8GB ची इनबिल्ट मेमरी असेल.
- चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफरसाठी मायक्रो USB पोर्ट असेल. 
- फोनसोबत 1650mAh ची बॅटरी असेल.

मॉडेलमध्ये काहीही बदल नही... 
- व्हिडिओनुसार, Nokia 3310 च्या मॉडेलमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याचा अर्थ फोन टचस्क्रीन नसून की-पॅडमध्ये बटन असतील. 
- न्यू कलर्समध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
- या हँडसेटची किंमत 59 यूरो अर्थात जवळपास 4,000 रुपये असण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतील न्यू  Nokia 3310 चे काही फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...