आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Nokia 3310 पुन्हा लॉन्च होणार, 17 वर्षांपूर्वी विक्री झाले होते 12 कोटी 60 लाख हँडसेट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- Nokia आपला अँड्रॉइड स्मार्टफोन Nokia 6 लॉन्च करून टेक मार्केटमध्ये री-एंट्री केली आहे. फ्लॅशसेलमध्ये या हँडसेटला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. Nokia 6 साठी लाखो ग्राहकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. यावरून Nokia क्रेझ ग्राहकांमध्ये अजूनही कायम असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर मोबाइल वर्ल्ड कांग्रेस 2017 मध्ये नोकिया जुन्या जमान्यातील आपले लोकप्रिय स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. यात बेस्ट सेलर फीचर फोन Nokia 3310  पुन्हा एकदा बाजारात उतरवणार आहे.

17 वर्षांपूर्वी बाजारात आला होता Nokia 3310...
Nokia 3310 GSM फोन होता. सप्टेंबर 2000 मध्ये कंपनीने हा फोन लॉन्च केला होता. यात Nokia 3210 या हँडसेटला कंपनीने रिप्लेस केले होते. नोकियाचा हा फोन सर्वाधिक लोकप्रिय ठरला होता. कंपनीने जगभरात या फोनचे 12 कोटी 60 लाख हँडसेट्स विकले होते.

4000 रुपये असू शकते किंमत...
Nokia 3310 Refresh ची किंमत EUR 59 जवळपास 4000 रुपये असण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप कंपनीतर्फे याबाबत कुठलीही घोषणा झालेली नाही.
 
पुढील स्लाइड्स क्लिक करून जाणून घ्या, Nokia 3310 च्या फीचर्सविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...