आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Nokia ची 10 वर्षांनंतर स्मार्टफोन मार्केटमध्ये एंट्री, 3 लो बजेट फोन लॉन्च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- नोकियाने दहा वर्षांनंतर भारतीय बाजारात परत येत Nokia6, Nokia 5 आणि Nokia 3 स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. त्यांची किंमत अनुक्रमे 14,999 रुपये, 12,899 रुपये व 9499 रुपये आहे. हे लो बजट स्मार्ट फोन नोकियाचे पहिले अॅड्रॉइड फोन आहेत. यापूर्वी नोकियाने लूमिया सीरीजचे विंडोज फोन लॉन्च केले होते.

16 जूनपासून सुरु होणार Nokia 3 ची विक्री
 
- Nokia 5 आणि Nokia 3 ची ऑफलाइन विक्री करण्यात येणार आहे.
- Nokia 3 ची विक्री 16 जून पासून सुरु होईल. Nokia 5 ची प्री-ऑर्डर बुकिंग 7 जुलैपासून सुरु होईल.
- Nokia 6 एक्सक्लूसिवली फक्त अॅमेझानवर मिळणार आहे. त्याचे रजिस्ट्रेशन 14 जुलैपासून सुरु होईल
- लॉन्च इव्हेंटमध्ये एचएमडी ग्लोबलने माहिती दिली की, नोकिया ब्रॅन्डचे सर्व हॅन्डसेट मेड इन इंडिया असतील.

मागीलवर्षी लॉन्च झाला Nokia 6
 
- Nokia 6 मागील वर्षी सर्वप्रथम चीनमध्ये लॉन्च झाला. त्यानंतर मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये Nokia 6 च्या उपलब्धतेची माहिती देण्यात आली. याच इव्हेंटमध्ये Nokia 3 आणि Nokia 5 च्या उपलब्धतेची माहिती देण्यात आली. 
- कंपनीने नोकिया 3310 ची नव्या लुकसह विक्री सुरु केली आहे. त्याची किंमत 3310 ठेवण्यात आली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...