आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोबाइलद्वारे लाइव्ह कार्यक्रमाची रेकॉर्डिंग करणे होणार अवघड, असे असेल तंत्रज्ञान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया- लाइव्हकार्यक्रमातील व्हिडिओ रेकॉर्ड करून तत्काळ यूट्यूब किंवा सोशल मीडियावर टाकण्याचे प्रमाण वाढले आहे, परंतु आता यावर निर्बंध येणार आहे. कारण आयफोन बनवणाऱ्या अॅपल कंपनीने लाइव्ह मैफलीतील व्हिडिओ रेकाॅर्डिंग बंद करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. बुधवारी यासंबंधीच्या पेटंटचे अधिकार कंपनीला मिळाले.

लाइव्ह मैफलीत सहभागी होणारे प्रेक्षक अनेकदा कार्यक्रमाची रेकॉर्डिंग करून ती तत्काळ यूट्यूबवर टाकतात, त्यामुळे बहुतांश प्रेक्षक तिकीट घेऊन मैफलीला येत नसल्याची तक्रार कार्यक्रमाचे आयोजक आणि कलाकारांकडून केली जात होती.

आता या नव्याने विकसित करण्यात आलेल्या नवीन तंत्रज्ञानामुळे मात्र कार्यक्रमात रेकॉर्डिंग करणे शक्य होणार नाही. या तंत्रज्ञानाचा उपयोग कधीपासून सुरू होईल, याबाबत अॅपल कंपनीकडून सांगण्यात आले नाही. नागरी स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या अनेक जणांनी याला कडाडून विरोध केला आहे. नेहमी धरणे, प्रदर्शने केली जातात अशा ठिकाणी या तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्या रीतीने होऊ शकतो आणि सरकारलाही हे सोयीस्कर असल्याची टीका लोकांनी केली. दुसरीकडे वस्तुसंग्रहालयात या तंत्रज्ञानाचा उत्तम पद्धतीने वापर होऊ शकत असल्याचेही अनेक जणांचे म्हणणे आहे.

अशापद्धतीने तंत्रज्ञान करेल काम
कार्यक्रमज्या व्यासपीठावरून सुरू असेल अशा ठिकाणाहून इन्फ्रारेड सिग्नल सोडण्यात येतील. या सिग्नलमध्ये रेकाॅर्डिंग फंक्शनला ‘डिसेबल’ करणारा कमांड कोड दिलेला असेल. आपण मोबाइलचा कॅमेरा ऑन करून व्यासपीठावर फोकस केल्यास या सिग्नलमुळे कॅमेरा आपोआप बंद पडेल.
बातम्या आणखी आहेत...