आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटोरोला नावाने हँडसेट विक्री बंद, पालक कंपनी लेनोव्होचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासवेगास- प्रख्यात ब्रँड मोटोरोलाचे फोन आता खरेदी करता येणार नाहीत. संगणक तंत्रज्ञान कंपनी लेनोव्होने जाहीर केल्यानुसार मोटोरोला ब्रँडच्या नावे फोनची विक्री कंपनी बंद करत आहे. लेनोव्होने २०१४ मध्ये गुगलकडून मोटोरोला खरेदी केली होती. मोटोरोलाचे सीओओ रिक ओस्टरला यांनी लासवेगास येथे सुरू असलेल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शनात ही घोषणा केली. मात्र, लेनोव्हो फोनवरील एम लोगोचा वापर मात्र सुरूच ठेवणार आहे. वटवाघळाचे पंख असणारा लोगो कंपनीने १९५५ मध्ये लाँच केला होता. आता या उत्पादनांवर मोटोरोलाऐवजी लेनोव्हो असे लिहिलेले राहील. मोटोरोला मोबिलिटी या नावे लेनोव्होचा फोन विभागही सुरूच राहील.
जगातील पहिला मोबाइल हँडसेट बनवण्याचे श्रेय मोटोरोलाकडे जाते. दशकभरापूर्वी हे या क्षेत्रातील बडे नाव होते. मात्र, नव्या स्वरूपाचे आणि स्वस्त स्मार्टफोन आल्यानंतर याची विक्री घसरली. गुगल कंपनीने २०१२ मध्ये मोटोरोला कंपनीकडून त्यांचा फोन व्यवसाय खरेदी केला होता. दोन वर्षांनंतर लेनोव्होने हा ब्रँड खरेदी केला. मोटोरोला ब्रँडला वाचवण्याशिवाय हा ब्रँड अधिक मजबूत करण्याची इच्छा असल्याचे त्या वेळी लेनोव्होने म्हटले होते.
पर्सनल कॉम्प्युटर बनवणारी लेनोव्हो ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. मात्र, स्मार्टफोन व्यवसायात ती अद्याप पिछाडीवर आहे.
जगातील पहिला मोबाइल हँडसेट
मोटोरोलाने१९७३ मध्ये पहिला पोर्टेबल बनवला होता. त्यानंतर १९८३ मध्ये कंपनीने डायनाटॅक ८००० एक्स नावाने जगातील पहिला हँडसेट सादर केला.
आर्मस्ट्राँगने मोटोरोलावर पाठवला होता संदेश
नासासाठीविविध रेडिओ उपकरणे पुरवण्याचे काम मोटोरोलाकडे दीर्घकाळ होते. नील आर्मस्ट्राँगने १९६९ मध्ये चंद्रावरून याच कंपनीच्या उपकरणाद्वारे आपला संदेश पृथ्वीवर पाठवला होता.