आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिस्काउंट ऑफरमध्ये मिळतोय OnePlus वन; ऑफर फक्त दोनच दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Oneplus वन स्मार्टफोन आता फक्त Amazon India साठी एक्सक्युसिव्ह राहिलेला नाही. 'Flipkart'वर आजपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तोही डिस्काउंट ऑफरमध्ये. 'Flipkart'ने Oneplus वनच्या किंमतीत तब्बल दोन हजार रुपयांची भरघोस सूट दिली आहे.

काय आहे ऑफर...
Flipkart ने Oneplus वनची विक्री सुरु करण्यापूर्वीच डिस्काउंट ऑफरची घोषणा केली आहे. या फोनवर दोन दिवस (22 - 23 जून) दोन हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. याचा अर्थ असा की Flipkartने हा फोन 19,998 रुपयांत उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय या फोनवर एक्सचेंज ऑफर देखील आहे. ऑफरनुसार, एक्सचेंजमध्ये या फोनवर 10000 रुपयांपर्यंत युजर्सला डिस्काउंट मिळेल. मात्र, 24 जूनपासून हा फोन आपल्या अधिकृत किमतीत अर्थात 21,998 रुपयांत उपलब्ध होणार आहे.
OnePlus वन (64GB)चे फीचर्स:
>अँड्रॉइड किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम (व्हर्जन 4.4)
>सायनोजेन OS ने अद्ययावत
>2.5GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 801 क्वॉड-कोअर प्रोसेसर
>578MHz एड्रेनो 330 GPU ने परिपूर्ण
>3GB रॅम
>64GB इंटरनल मेमरी
>5.5 इंचाचा LTPS IPS स्क्रीन फुल HD (1920 x 1080 पिक्सल रेझोल्युशन)
>3100mAH ची दमदार बॅटरी
>सिंगल सिम
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, Oneplus वनचे इतर फीचर्स-