आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Online Shopping Through Face Recognition Possible

चेहरा ओळखून ऑनलाइन शॉपिंग शक्य, तयार होतोय विशेष अॅप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - चेह-याची ओळख पटवून ऑनलाइन शॉपिंग करता येऊ शकणारे अॅप मास्टर कार्ड विकसित करत आहे. युजर सेल्फी काढताना जसा स्मार्टफोन धरतात तसा वापर अॅप्लिकेशन वापरताना करतील. मास्टर कार्डचे सुरक्षातज्ज्ञ अजय भल्ला म्हणाले, सेल्फीचा वापर करणा-या नव्या पिढीला हे एक चांगले अॅप आहे. चेहरा ओळखण्यासोबत सुरक्षेचे आणखी उपाय योजले आहेत, अशी माहिती आणखी एका तज्ज्ञाने दिली.

पेन टेस्ट पार्टनर्सचे सुरक्षातज्ज्ञ केन मुनरो म्हणाले, गुगलने याआधीच फेसियल रेकग्निशन तंत्राचा अँड्रॉइड फोनमध्ये वापर केला आहे. मात्र, यामध्ये अनेक समस्या होत्या.

आता या समस्या भेडसावतात
>मुनरो म्हणाले, लोकांना कॅमे-यासमोर फोन ठेवणे जास्त सुरक्षित वाटत नाही.
>गुगलनेही आपले फेसियल रेकग्निशन लॉक पॅटर्न किंवा पिनकोडच्या तुलनेत कमी सुरक्षित असल्याचे मान्य केले आहे. तुम्हीच अॅपचा वापर करतात का हे समजण्यासाठी मास्टर कार्डचे अॅप्लिकेशन युजरला कॅमे-यासमोर डोळा मारायला लावते. मात्र, या पद्धतीत फसवणूक होऊ शकते.

आर्थिक प्रकरण
पेन टेस्ट पार्टनर्सचे सुरक्षातज्ज्ञ मुनरो म्हणाले, मास्टर कार्डला सुरक्षेच्या अनेक योजना कराव्या लागतील. तुमचा सुरक्षा कोड चोरी झाल्यास तुम्ही तो बदलता. मात्र, फेसियल रिकग्निशन डेटा चोरी झाल्यास तुम्ही चेहरा बदलू शकत नाहीत. मास्टर कार्ड आर्थिक प्रकरणांत असल्यामुळे त्यांनी त्यास आणखी सुरक्षित केले पाहिजे. ग्राहकांना सोईस्कर वाटावे यासाठी मास्टर कार्ड फिंगर प्रिंट आणि आवाजाची शक्यता तपासत अाहे.

पुढे वाचा, सध्या नवीन काय सुरू आहे ?