आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Protesting Aamir Khan’s Comments Give Snapdeal App 1 star Reviews On Google

आमिर खानच्या वक्तव्यावर नाराज यूजर्स Uninstall करत आहेत snapdeal App

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या देशातील असहिष्णुतेबद्दलच्या विधानामुळे राजकारणासोबतच बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. आमिरवर चौफेर टीका होत आहे. या सगळ्या प्रकाराचा परिणाम ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट स्नॅपडीलला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आमिर खान हा स्नॅपडीलचा अॅम्बेसडर आहे. स्नॅपडील अनइस्टाल करून यूजर्स आमिर खानविरोधात आपला संताप व्यक्त करत आहेत.

आमिर खानने सोमवारी एका कार्यक्रमात देशातील असहिष्णुतेबद्दलचे वक्तव्य केले होते. 'आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, हे मी एक व्यक्ती, एक नागरिक आणि या देशाचा एक भाग म्हणून आपण वर्तमानपत्रांतून वाचतो, टीव्हीवर पाहतो. त्यामुळे निश्चितपणे मी धास्तावलेलो आहे. त्याचा इन्कार करू शकत नाही. अनेक घटनांनी मला चिंतेत टाकले. मुलांच्या सुरक्षेबाबतच्या भीतीमुळे एकदा तर पत्नीने (किरण राव) भारतच सोडून जाऊ, अशी इच्छा व्यक्त केली होती, असे आमिरने म्हटले होते. आमिरच्या वक्तव्यावरुन देशात चौफेर रान पेटले आहे. सोशल मीडियावर तर आमिरच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात येत आहे.

यूजर्स स्नॅपडील अॅप करताय अनइस्टाल
आमिर खान हा स्नॅपडीलचा ब्रॅंड अॅम्बेसडर आहे. नाराज यूजर्स स्नॅपडील अॅप अनइस्टाल करत आहे. इतकेच नव्हे तर गूगल प्लेस्टोअरवर जाऊन स्नॅपडील अॅपला '1 स्टार रेटिंग' देत आहेत. त्याचप्रमाणे आमिरची ब्रँड अम्बेसडरपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.