आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळत आहे LGचा स्‍मार्टफोन, Gionee A1ही 3000रुपयांनी स्‍वस्‍त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्‍क- चिनची स्‍मार्टफोन कंपनी जिओनीने आपल्‍या Gionee A1 या स्‍मार्टफोनची किंमत तब्‍ब्‍ल 3000 रुपयांनी कमी केली आहे. हा स्‍मार्टफोन भारतात 19,999 रुपयांमध्‍ये लाँच झाला होता. आता हा फोन केवळ 16,999 रुपयांमध्‍ये मिळणार आहे. दुसरकीकडे LGनेही आपल्‍या स्‍मार्टफोनच्‍या किमतीमध्‍ये मोठी घट केली आहे. LGचा G6 हा स्‍मार्टफोन लाँचिंग प्राइसपेक्षा 14 हजार रुपयांनी स्‍वस्‍त झाला आहे. 
 
- जिओनीने एप्रिलमध्‍ये Gionee A1 हा स्‍मार्टफोन भारतात लाँच केला होता. तेव्‍हा याची किंमत 51,990रुपये एवढी होती. कंपनीने आता याची किंमत 14 हजार रुपयांनी घटविली आहे. 
- किंमत कमी करण्‍याव्‍यतिरिक्‍त कंपनीने जिओसोबत पार्टनरशिपही केली आहे. त्‍यानुसार हा फोन खरेदी करणा-यांना जिओचा 60जीबी 4G डाटा दिला जाणार आहे. यासाठी युझरला 304 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. 
- या फोनमध्‍ये 5.5 इंचाचे आईपीएस FHD डिसप्‍ले आहे. फोनमध्‍ये मिडीयाटेक हेलियो  P10 प्रोसेसर आहे. याची रॅम 4जीबीची असून इंटरनल मेमरी 64जीबीची आहे. 4010 mAhची बॅटरी आहे. 
- फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो त्‍यासोबतच 4जी VoLTE कनेक्‍टीव्‍हीटीची सुविधाही यात असणार आहे. या स्‍मार्टफोनमध्‍ये 16 मेगापिक्‍सलचा फ्रंट सेल्‍फी कॅमेरा आणि 13 मेगापिक्‍सलचा रिअर कॅमेरा आहे. या फोनमध्‍ये फिंगरप्रिंट सेंसरचीही सुविधा आहे. 
 
असा मिळेल जिओचा फ्री डाटा 
- यासाठी युझरला किमान 309 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. असे केल्‍यास युझरला 60जीबीचा 4जी डाटा मिळेल. युझरला प्रत्येक रिचार्जसोबत 10जीबीचा अतिरिक्‍त डाटा दिला जाईल. ही ऑफर 6 रिचार्जपर्यंत वैध असणार आहे. 
- यासोबतच कंपनीने पेटीएमसोबतही करार केला आहे. याअंतर्गत युझरला 250 रुपयांचे 2 पेटीएम कॅशबॅक व्‍हाऊचर मिळतील. हे व्‍हाऊचर त्‍यांना पेटीएम वॉलेटमध्‍ये मिळतील. पेटीएम मॉलमधून खरेदी करुन हे व्‍हाऊचर युझर वापरु शकतात. यासाठी किमान 350 रुपयांची खरेदी युझरला करावी लागेल. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, G6च्‍या किमतीतही मोठी घट... 
 
 
बातम्या आणखी आहेत...