आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Poonam Pandey’s Releases Her Hot Video, UC Browser Launches 10.7 Amidst Huge Buzz

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूनम पांडेच्या हॉट व्हिडिओमागील रहस्य उलगडले, लॉन्च झाला UC Browser 10.7

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'योगा'आता सेलिब्रिटीजची देखील पहिली पसंत बनली आहे. मात्र, जेव्हाही पूनम पांडे हिचा विषय निघतो तेव्हा तो ‘हॉट टॉपिक' बनून जातो. आता हेच पाहा ना, मागील आठवड्यापासून 'ट्विटर' आणि इतर सोशल प्लॅटफॉर्मवर सुरु असलेल्या खमंग चर्चेला पुनमने सोमवारी पूर्णविराम दिला आहे. पूनम यावेळी काही वेगळेच घेऊन आली आहे. हॉट इंटरनेट सेंसेशन पूनमच्या 'सेक्सी योगा व्हिडिओ आणि पोझेस' मागील रहस्य जगासमोर आले आहे. पूनमने या व्हिडिओतून पूनमने देशातील आघाडीचे मोबाइल ब्राउझरचे नवे यूजर इंटरफेस व्हर्जन UC Browser 10.7 लॉन्च केले आहे.

पूनमने आपल्या लेटेस्ट 'ट्वीट'मध्ये म्हटले आहे की, 20 हजारांहून जास्त व्ह्यूवर्सने पाहिला व्हिडिओ मुळात UC Browser 10.7 च्या लॉन्चिंगसाठी बनवण्यात आला आहे.

दरम्यान, पूनमने मागील आठवड्यात एका अनाऊन्समेंट खळबळ उडवून ‍दिली होती. सेक्सी योगा व्हिडिओचा टीजर लॉन्च करून ''पाच दिवस आणि काही तरी मोठे होणार आहे.'', असे सांगून पूनमने फॅन्समध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली होती. विषेश म्हणजे पूनमच्या लेटेस्ट व्हिडिओत तिला योगा पोझेजचे काउंटडाउन करण्यासोबतच अनाउन्स करताना दाखवण्यात आले होते. पूनमचा हा व्हिडिओ तिच्या फॉलोअर्सने शेअर केला होता. इतकेच नव्हे तर इतर सोशल प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ अक्षरश: व्हायरल झाला होता.

पूनम म्हणाली 'इंटरनेटवरील सगळ्यात हॉट गोष्ट म्हणजे "यूसी ब्राउझर"
पूनमने आपल्या ट्‍वीटमध्ये 'इंटरनेटवरील सगळ्यात हॉट गोष्ट म्हणजे "यूसी ब्राउझर" असल्याचे म्हटले आहे.

StatCounter एजन्सीनुसार, देशातील पहिल्या क्रमांकांचे मोबाइल ब्रॉउझरचे डेव्हलपर UCWeb ने या सेग्मेंटमध्ये 48 टक्के शेअरिंगसोबत मार्केट आपला दबदबा निर्माण केला आहे. यूजर्सला सर्फिंगचा आनंद घेता यावा, हाच एकमेव उद्देश UC Browser 10.7 व्हर्जन लॉन्च करण्‍यामागे असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
UC Browser चे लेटेस्ट व्हर्जन Google Play वरुन डॉउनलोड करता येईल.

पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटो...