आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Popular 'Black Friday' Sale To India Big Discount On International Brands

'Black Friday' सेल भारतातही, इंटरनॅशनल ब्रँड्सवर up to 50 %

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
US मध्‍ये क्रिसमससाठी एक महिना आधीपासूनच शॉपिंग आणि सेलला सुरूवात झाली आहे. या सणा निमित्‍त कंपन्‍या आपले प्रोडक्‍टस् कमी किमतीत विक्री करतात. या निमित्‍ताने वेस्टर्न कंट्रीजमध्‍ये 27 नोव्‍हेंबरला 'Black Friday' सेलचे आयोजन करण्‍यात येणार आहे. यात सर्व कंपन्‍या कमी किमतीत आपल्‍या प्रोडक्‍टची विक्री करणार आहे.
यावेळी भारतीय ग्राहकांना देखील या सेलचा फायदा मिळणार आहे. ई-कॉमर्स कंपनी ईबे लोकप्रिय सेल भारतात देखील लावणार आहे. 27 नोव्‍हेंबरला ईबे कंपनी भारतीय ग्राहकांना इंटरनॅशनल ब्रँड्सवर Big डिस्काऊंट देणार आहे. यात कंपनी इलेक्ट्रॉनिक्स, लाइफस्टाइल, होम अॅप्लायन्‍सेस, स्पोर्ट्स आणि फिटनेस इक्विपमेंट्सवर 45 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत डिस्काऊंट देणार आहे.
कंपनीचे भारतीयप्रमुख नवीन मिस्त्री यांनी सांगितले की, भारतीय ग्राहक फॅशन आणि लाइफस्टाइल प्रोडक्ट्स वर 50 टक्‍के आणि इलेक्ट्रॉनिक प्रोडक्‍टवर 45 टक्‍के डिस्‍काऊंट देण्‍यात येणार आहे. याचा लाभ भारतीय ग्राहाकांना देखील घेण्‍यात येणार आहे.