Home | Business | Auto | purchase SUV on half price on these websites

4.5 लाखांमध्ये सफारी, 7.5 लाखांमध्ये एंडेव्हर, अर्ध्या किमतीत खरेदी करा SUV

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 15, 2017, 11:22 AM IST

नवी दिल्ली- ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत सर्वांत जास्त ग्रोथ ही स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्समध्ये दिसून येत आहे.

 • purchase SUV on half price on these websites
  नवी दिल्ली- ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत सर्वांत जास्त ग्रोथ ही स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्समध्ये दिसून येत आहे. सध्याच्या बाजारपेठेत ग्राहकांचा कल एसयुव्हीकडे जास्त असल्याचे या ट्रेंडवरुन स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बजेट जास्त असल्याने एसयुव्ही विकत घेणे जरा अवघड होऊन बसते. पण सेकंड हॅंड मार्केटमध्ये आपल्याला चांगले पर्याय मिळू शकतात. विशेष म्हणजे या कार कंपन्यांनी सर्टिफाइड केल्या असल्याने विकत घेण्यात जास्त रिस्क नसते.
  कुठे विकत घेता येतील या कार
  सेकंड हॅंड कारचे ऑर्गनाईज प्लेअर जसे ड्रूम, कारदेखो यासह टोयोटाच्या योटोटा ट्रस्ट, महिंद्राच्या फस्ट च्वॉईस आणि मारुती सुझुकीच्या ट्रूव्हॅल्यू येथून सर्टिफाईड कार विकत घेता येतात. येथे कारचे नीट इन्पेक्शन केले जाते. त्यानंतर त्या ग्राहकाला विकल्या जातात. तसेच या कार विकत घेण्यासाठी फायनान्स सुविधा दिली जाते. आज आम्ही तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये एसयुव्ही खरेदी करण्याचे पर्याय दाखवणार आहोत. येथील कार सुमारे ३ ते ५ वर्षे जुन्या असतात.
  टाटा सफारी
  वेबसाईटवर तुम्ही टाटा मोटर्सची फेमस एसयुव्ही खरेदी करु शकता.
  कितीत खरेदी करता येईल- ४.५ ते ६ लाखांपर्यंत.
  किती चालली- ५० हजार ते ९० हजार किमी.
  मुळ किंमत- १०.४ ते १३.४ लाख रुपये
  पुढील स्लाईडवर वाचा... इतर एसयुव्ही खरेदीचे बजेटमधील ऑप्शन्स....

 • purchase SUV on half price on these websites
  फोर्ड एंडेव्हर
  सेकंड हॅण्ड ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ही कार खरेदी करता येईल. ५ वर्षांपेक्षा जुने मॉडेल शोधले तर सुमारे ६० टक्के कमी किमतीला कार विकत घेता येईल.
   
  कितीला मिळेल- ७.२५ लाखांपासून ८ लाखांपर्यंत.
  किती चालली- ५२ हजार ते ६० हजार किमी.
  मुळ किंमत- २५ लाख रुपये
   
 • purchase SUV on half price on these websites
  टोयोटा फॉर्च्युनर
  टोयोटा सर्वांत प्रसिद्ध एसयुव्ही आहे. टोयोटाचे सेकंड हॅंड प्लॅटफॉर्म टोयोटा ट्रस्ट सर्टिफाइड कारच्या वेबसाईटवर ही खरेदी करता येईल.
   
  कितीत मिळेल- १२ लाख ते १८.५० लाख.
  किती चालली- ६६ हजार ते १ लाख किमी.
  मुळ किंमत- २५ लाख रुपये
 • purchase SUV on half price on these websites
  महिंद्रा स्कॉर्पियो
  महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या सेकंड हॅण्ड कार प्लॅटफॉर्मवर म्हणजेच फस्ट चॉइसवर ही कार खरेदी करता येईल. ही भारतातील सर्वांत पॉप्युलर एसयुव्ही आहे.
   
  कितीत मिळेल- ५ ते ७.०६ लाख रुपये.
  किती चालली- ५८ हजार किमी.
  मुळ किंमत- ९.९ ते १५.५६ लाख रुपये
 • purchase SUV on half price on these websites
  महिंद्रा एक्सयुव्ही ५००
  महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या फस्ट चॉईस या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ही कार खरेदी करता येईल. महिंद्राच्या तंत्रज्ञांनी तिची तपासणी केली असेल.
   
  कितीत मिळेल- ७ ते ११.५० लाख
  किती चालली- २७ हजार किमी.
  मुळ किंमत- १२.४७ ते १७ लाख रुपये

Trending