आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाचा तुरीच्या उत्पादनाला फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दक्षिण भारतात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे पावसाच्या सरासरीपेक्षा कमी होणार्‍या आकडेवारीला वाढण्यास मदत मिळेल. याचा परिणाम तुरीवर होण्याची शक्यता असून तूर उत्पादनात वाढ होण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

गेल्या आठवड्यात दक्षिण भारतात जूनपासून आतापर्यंत २० टक्के कमी पाऊस पडला. जो आता घटून १७ टक्के वर आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार गेल्या २४ तासांत दक्षिण भारतात अंदाजे १०.९ मिलिमीटर पाऊस झाला असून जो सामान्याच्या तुलनेत १५३ टक्के जास्त आहे.

कर्नाटकामध्ये गेल्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येणार्‍या काळात या भागात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर महाराष्ट्रातील काही भागांत देखील मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. कर्नाटक आणि महाराष्ट्र हे तूर उत्पादनातील देशाचे केंद्रबिंदू मानले जाते. या भागात पडलेल्या पावसामुळे तुरीच्या पिकाला जीवदान मिळाले असून यामुळे अंदाज व्यक्त केल्यापेक्षा तुरीचे उत्पादन वाढण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. खरीप हंगामातील पिकांमध्ये सर्वात उशिरा तुरीच्या शेंगा येतात. त्यामुळे याला जास्त फायदा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.