आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जदारांना दिलासा नाहीच; RBI कडून व्याजदरात NO Change, रेपो रेट जैसे थे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी चालु आर्थिक वर्षातील दुसरे द्वैमासिक पतधोरण जाहीर केले. राजन यांनी देशातील कर्जधारकांना कोणताही दिलासा दिलेला नाही. रेपो रेट 6.5 टक्के तर रिव्हर्स रेट 6 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.

राजन यांनी दिले महागाई वाढीचे संकेत...
जागतिक स्तरावर मंदीचे सावट आहे. त्यात क्रुड ऑइलच्या दरात अनिश्चिततेबाबत राजन यांनी चिंता व्यक्त केली आहे. राजन यांनी भविष्यात महागाई वाढण्याचे संकेतही दिले आहेत. सावधगिरीची उपाय म्हणून व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राजन यांनी सांगितले. यंदा मान्सून समाधान कारक झाल्या स व्याजदरात कपात होण्याची शक्यताही राजन यांनी वर्तवली आहे.

सध्या काय आहेत रिझर्व्ह बॅंकेचे दर...?
रेपो रेट- 6.50 %
रिव्हर्स रेपो रेट- 6 %
मार्जिनल स्‍टॅडिंग फॅसिलिटी- 7 %
सीआरआर- 4 %
एसएलआर- 21.25 %

राजन यांच्या समोर आहेत ही आव्हाने...
1. मान्सूसची स्थिती
2. क्रूड अॉइलच्या दराबाबत अनिश्चितता
3. वाढती महागाई
4. यूनाइटेड किंगडम व चीनच्या बाजारात अनिश्चितता

पुढील स्लाइडवर वाचा, पुढील स्लाइडवर वाचा, काय असतो रेपो व रिव्हर्स रेट
बातम्या आणखी आहेत...