आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NET NEUTRALITY: दुरसंचार समिती internet.org, स्काइप, व्हाॅट्सअॅप विरोधात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नेटन्यूट्रिलिटीच्या मुद्द्यावर स्थापलेल्या दूरसंचार विभागाच्या एक समितीने आपला अहवाल सोपवला आहे. त्यात स्काइप, व्हाॅट्सअॅप आणि व्हायबरसारख्या इंटरनेट आधारित अॅपद्वारेच्या देशांतर्गत कॉलच्या नियमनाची शिफारस केली आहे.

दुसरीकडे, समितीने मोबाइल डाटा शुल्क आकारता काही वेबसाइटचा मोफत अॅक्सेस देणाऱ्या फेसबुकच्या इंटरनेट.ओआरजी या प्रकल्पाला विरोध केला आहे. एअरटेल झीरोसारखे प्लॅन ट्रायच्या मंजुरीनंतरच सुरू व्हावेत, असे ए.के. भार्गव यांच्या या समितीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

अहवाल अंतिम नाही, जनहिताचा निर्णय घेऊ
दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, हा मंत्रालय भारत सरकारचा अहवाल नाही. फक्त शिफारशी आहेत. त्यावर जोवर ट्रायचा अहवाल येत नाही तोवर कोणत्याही अहवालास अंतिम रूप देता येत नाही. दोन्ही अहवालांच्या तुलनात्मक अभ्यासानंतरच मंत्रालय लोकहित लक्षात ठेवून निर्णय घेईल, असे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...