आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्री सिम घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा, वाचा तुमचा स्मार्टफोन Jio 4G ला सपोर्ट करतो का...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलायन्स Jio 4G च्या फ्री सिमची सर्वत्र चर्चा आहे. Jio ने ग्राहकांंना आकर्षित करण्यासाठी फ्री 4G इंंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांंना तीन महिने विनामुल्य अनलिमिटेड इंंटरनेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळेे Jio 4G चे सिम घेण्यासाठी देशातील अनेक शहरांमध्ये रिलायन्स स्टोअर्ससमोर अक्षरश: नागरिकांनी रांगा लावल्या आहेत.

भुवनेश्वर, अहमदाबाद, लखनौ, भोपाळ आणि मोहालीत तर काल, गुरुवारी लोकांनी रिलायन्स डिजिटल आणि डिजिटल एक्स्प्रेस स्टोअरसमोर रात्री 2 वाजेपासून रांगा लावल्या होत्या.

कसे मिळवाल रिलायन्स jio 4G सिम...
- रिलायन्सची ही ऑफर केवळ काही ब्रॅंंडच्या स्मार्टफोनवरच उपलब्ध आहे. यात सॅमसंग, एलजी, पॅनासोनिक, मायक्रोमॅक्स, आसुस, टीसीएल, अल्काटेल आणि एलवायएफच्या 4G डिव्हाइसचा समावेश आहे.
- सिम मिळवण्यासाठी आयडेंटिटी कार्ड, अॅड्रेस प्रूफशिवाय दोन पासपोर्ट साइज फोटो आवश्यक आहे. ऑफर सिम अॅक्टिव्हेशननंतर 90 दिवसांसाठी व्हॅलिड राहिल.
- कंपनीच्या रिफरल प्रोग्रामच्या माध्यमातून ग्राहकांंच्या माध्यमातून सिम मिळवणे खूप सोपेे आहे. रिलायन्स यूजर्स आपल्या आप्तजणांंना फ्री सिम मिळवूून देऊ शकतात.
- या प्रोग्रामनुुसार, अनेक रिलायन्स यूजर्सला 'फेसबुक'वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवता येईल.

पुढील स्लाइडवर वाचा, Reliance Jio 4G फ्री अनलिमिटेड इंटरनेट ऑफर आता या ब्रँड्‍सच्या स्मार्टफोन्सवरही
बातम्या आणखी आहेत...