आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्स Jio चा नवा प्लॅन; अवघ्या 399 रुपयांत 84 दिवस मिळणार सबकुछ फ्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रिलायन्स जिओची 'धन धना धन ऑफर' संपण्याची शक्यता आहे. यादरम्यान रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी नवे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन सादर केले आहेत. कंपनीने नवे प्लॅन जिओ धन धना धन ऑफर नावानेच सादर केले आहेत. तथापि, या वेळी अनेक रिचार्ज पॅक बदलले आहेत. खरेतर कंपनीने याआधीही म्हटले होते की, ते इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत नेहमी स्वस्त प्लॅन आणत राहील.
 
काय आहे नवा प्लॅन?
- रिलायन्स जिओच्या या प्लॅनचा फायदा उचलण्यासाठी प्राइम मेंबरशिप गरजेची आहे. रिलायन्स जिओकडे 19 रु. पासून 9,999 रु. पर्यंत अनेक प्लॅन आहेत. यात कंपनीने 309 रु. पासून ते 9,999 पर्यंत पोस्टपेड आणि प्रीपेड प्लॅन अपडेट केले आहेत.
 
399 रुपयांत मिळेल 84 जीबी डाटा
-रिलायन्स जिओच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या प्लॅनअंतर्गत प्रीपेड कस्टमर्सना 399 रुपयांत 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत 84जीबी डाटा मिळेल. म्हणजेच दररोज युजर 1 जीबी डाटा वापरू शकतात. सोबतच पूर्वीप्रमाणेच अनलिमिटेड कॉलिंग, रोमिंग फ्री आणि मेसेजेसची सुविधा असेल. 
- याआधी एप्रिलमध्ये लाँच झालेल्या धन धना धन ऑफरअंतर्गत प्राइम मेंबरशिप असणाऱ्या कस्टमर्सना फक्त 309 रुपयांत 84 दिवसांसाठी या सर्व सुविधा मिळत होत्या. त्या अर्थाने हा पॅक 90 रुपयांनी महाग आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये जाणून घ्या, जिओचे इतर नवे प्लॅन कोणकोणते आहेत...
बातम्या आणखी आहेत...