आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खुशखबर! रविवारपासुन पुन्‍हा खरेदी करता येणार जिओ फोन, अशी करा बुकिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्‍क- ज्‍यांना जिओ फोन खरेदी करायचा आहे, त्‍यांच्‍यासाठी खुशखबर आहे. कंपनी आपल्‍या 4G फोनच्‍या बुकिंगला पुन्‍हा एकदा सुरुवात करणार आहे. त्‍यामुळे मार्केटमध्‍ये स्‍मार्टफोन आणि जिओ फिचर फोनमध्‍ये जोरदार टक्‍कर बघायला मिळू शकते. नुकतेच एअरटेलने कार्बन कंपनीसोबत पार्टनरशिप करुन कमी किमतीतील स्‍मार्टफोन बाजारात आणले आहे.  


पहिल्‍या टप्‍प्‍यात 60 लाख जणांनी केली होती बुकिंग 
- जिओ फोनच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यात 60 लाख जणांनी बुकिंग केली होती. 24 ते 26 ऑगस्‍ट दरम्‍यान ही बुकिंग करण्‍यात आली होती. ज्‍यांनी बुकिंग केली होती त्‍यांना जिओ फोन डिलिव्‍हर करण्‍यात आले आहेत. टेलिकॉम इंडस्‍ट्रीनूसार देशात अजुनही 50 कोटी लोक असे आहेत जे स्‍मार्टफोन वापरत नाही. हे युझर सध्‍या सर्व टेलिकॉम कंपन्‍यांच्‍या टारगेटवर आहेत. 

 

फोनसाठी अशी करा बुकिंग 
- जिओ फोनची बुकिंग करण्‍यासाठी सर्वात प्रथम www.jio.com या वेबसाईटवर जा. तेथे तुम्‍हाला फोनसाठी नोंदणी करता येईल. वेबसाईटवर नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पिन कोड याची नोंद करा. त्‍यानंतर जिओतर्फे एक लिंक पाठवली जाईल. या लिंकवर क्लिक केल्‍यास एक कोड मिळेल. हा कोड शहरातील संबंधित जिओ स्‍टोरवर दाखवून कस्‍टमर मोबाईल खरेदी करु शकतील. मिडीया रिपोर्टनूसार, रविवारपासून लिंक पाठवण्‍यास सुरुवात आहे. 


पुढील स्‍लाइडवर वाचा, 1500रुपयांत आहे जिओ फोन...
 

बातम्या आणखी आहेत...