आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ringing Bell Freedom 251 \'Cheapest Smartphone\' To Launch On Wednesday

काय सांगता!!! फक्त 251 रुपयांत स्मार्टफोन, जाणून घ्या आकर्षक फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय कंपनी 'रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेड' देशातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन 'Freedom 251' बुधवार संध्याकाळी लॉन्च झाला. स्मार्टफोनची किंमत एवढी कमी कशी, यावर चर्चा झडली असून सरकारने "वेट अँड वॉच' भूमिका घेतली आहे. म्हणूनच या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरही गेले नाहीत. शेवटी भाजप खासदार मुरली मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत या फोनचे लाँचिंग झाले.

अपडेटेड फीचर्ससह उपलब्ध असलेला हा स्मार्टफोन ग्राहकांना केवळ 251 रुपयांत उपलब्ध होणार आहे. ‘Freedom 251’ स्मार्टफोनचे बुकिंग गुरुवारी सकाळी सहा वाजेपासून सुरु झाले आहे.
उल्लेखनिय म्हणजे Freedom 251ची निर्मिती भारतात होणार आहे. हँण्डसेटसाठी लागणारे पार्ट्‍स आयात करण्यात आले आहेत. त्यांची जोडणी भारतात केली जाणार आहे. यूजर्सला या ड्युअल सिम स्मार्टफोनमध्ये 3G सेवेचा लाभ घेता येणार आहे. या स्मार्टफोनवर एक वर्षाची वॉरंटी देण्यात आली असून संपूर्ण देशात कंपनीचे 650 सर्व्हिस सेंटर उघडण्यात आले आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा,
@ Ringing Bells Freedom 251 चे फीचर्स...
@ वाचा, कसा ऑर्डर करणार 251 रुपयांचा स्मार्टफोन

@ पाहा, Ringing Bells Freedom 251 चे ग्राफिक्स...
@ Ringing Bells नुकताच बाजारात अालेला 4G Smart 101 चे स्पेसिफिकेशन्स