आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Rajput Makes His Village WI FI And Given Free Internet

मध्य प्रदेशचा Fung Suk wangdu: त्याच्या एका Idea ने गाव झाले Hightech

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन यांच्यासोबत उभा सचिन राजपूत - Divya Marathi
अमिताभ बच्चन यांच्यासोबत उभा सचिन राजपूत
इंदूर- मध्य प्रदेशातील धरमपुरी येथील रहिवासी सचिन राजपूत या युवकाने सात ब्रॉडबॅंड कनेक्शन घेऊन संपूर्ण गावात WI-FI नेटवर्क उभे केले आहे. पासवर्ड फ्री WI-FI असल्याने गावातील तरुण याचा लाभ घेत आहेत. यापूर्वी 2जी आणि 3जी पॅकसाठी 150 ते 600 रुपये मोजावे लागत होते. आता केवळ 50 रुपयांमध्ये गावातील तरुणांना इंटरनेट उपलब्ध झाले आहे.

सचिनच्या कामापासून प्रभावित होत अमित जाट आणि विश्वजित यांनी मिळून 25 हजार रुपये गोळा केले. त्यातून बीएसएनएलकडून सात ब्रॉडबॅंड कनेक्शन घेतले. यांना जोडण्यासाठी मॉडेम टू राऊटर याचा वापर करण्यात आला. दोन कनेक्शनमध्ये 300 मीटरचे अंतर ठेवण्यात आले. एक कनेक्शन 150 चौरस मीटरचे अंतर कव्हर करते. यामुळे संपूर्ण गाव WI-FI झाले आहे. गाव WI-FI झाल्यावर येथील इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये तब्बल 75 टक्क्यांनी वाढ झाली.

गावातील सुमारे 75 टक्के लोक निःशुल्क इंटरनेट वापरतात. सचिन आणि त्याच्या मित्रांनी कुणाकडूनही कोणतेही शुल्क घेतले नाही. तरीही गावातील काही युवक स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन त्यांना पैसे देत आहेत. इंटरनेटचे बिल वाचल्याने यातील उर्वरित रक्कम ते सचिन यांना पुढील विकासासाठी देत आहेत. सचिनने सांगितले, की सात कनेक्शनचे महिन्याचे बिल सुमारे पाच हजार रुपये येते.

सध्या त्यांना मासिक 7500 रुपये उत्पन्न होत आहे. यातील अतिरिक्त रक्कम गावात एलएडी बल्ब लावण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

'केबीसी'मध्ये गेला होता सचिन
सचिन काही वर्षांपूर्वी कौन बनेगा करोडपतीमध्ये (केबीसी) गेला होता. पण तो केवळ फास्टेट फिंगर फस्ट या राऊंडपर्यंतच पोहोचू शकला. त्याला हॉटसिट मिळाली नाही.

पुढील स्लाईडवर बघा, WI-FI मुळे हायटेक झालेल्या धरमपुरीतील काही फोटो...