आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंग व मायक्रोमॅक्स बंद करणार 2G स्मार्टफोनची विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय गॅजेट मार्केटमधील अग्रेसर सॅमसंग व मायक्रोमॅक्स कंपनी 2G स्मार्टफोनची विक्री बंद करण्याचा विचार करत आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार दोन्ही कंपन्या भविष्यात 3G व 4G नेटवर्कवर चालणार्‍या हॅंडसेटवर फोकस करणार आहे. दरम्यान, मागील काही महिन्यात 2G स्मार्टफोन्सच्या किमती झपाट्याने खाली आल्या आहे. दुसरीकडे, रिलायन्स जियो या महिन्यात मार्केटमध्ये पदार्पण करत आहे.

मायक्रोमॅक्स इन्फॉर्मेटिक्सचे CEO विनीत तनेजा यांनी सांगितले की, बहुतेक टेलिकॉम ऑपरेटर्सनी 4G सर्व्हिस लॉन्च करण्यासोबत 4G हॅंडसेट्सवर फोकस केला आहे. सध्या मायक्रोमॅक्सच्या हॅंडसेट्सच्या विक्रीत 4G हॅंडसेट्सचे कॉन्ट्रिब्यूशन 30 टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या मार्केटमध्ये मायक्रोमॅक्सचे 14 हॅंडसेट्‍स 4G नेटवर्क सर्पोटेड आहेत.

रिलायन्स जियो या महिन्यात 4G सर्व्हिस लॉन्च करणार आहे. या पार्श्वभूमीवर एअरटेल आणि वोडाफोन सारख्या टेलिकॉम कंपन्यांनी आपली 4G सर्व्हिस लॉन्च केली आहे. दुसरीकडे, 4G हॅंडसेट्सची मागणी घटली आहे. त्यामुळे किमतीवरही परिणाम जाणवत आहे.

रिपोर्टनुसार, 2G हॅंडसेट बंद झाल्यानंतर 3G व 4G हँडसेटच्या किमती कमी होण्याची शक्यता नाकारता येतो. सॅमसंग आणि मायक्रोमॅक्स कंपनीने आपल्या 2G हॅंडसेटचा स्टॉक कमी केली आहे. सॅमसंग कंपनी‍ने 2015 मध्ये एकूण 25 हॅंडसेट्स लॉन्च केले होते. त्यात 16 हॅंडसेट 4G सर्पोटेड आहेत.
बातम्या आणखी आहेत...