आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज भारतात लाँच होणार सॅमसंग Note 8, या 5 गोष्‍टी असणार खास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्‍क- आज दुपारी 12 वाजता दिल्‍लीतील एका इव्‍हेंटमध्‍ये सॅमसंगचा फ्लॅगशिप फोन Note 8 लाँच झाला आहे. भारतात 66,000 रुपयांच्‍या आसपास या फोनची किंमत असणार आहे. व्‍हेरियंट मिडनाईट ब्‍लॅक, मॅपल गोल्‍ड, ऑर्चिड ग्रे आणि डीप सी ब्‍लू या 4 रंगात फोन उपलब्‍ध असणार आहे. 

Galaxy Note 8 मध्‍ये असणार पॉवरफूल कॅमेरा
या स्‍मार्टफोनचे वैशिष्‍टये म्‍हणजे यामध्‍ये 12 मेगापिक्‍सलचा ड्युअल-रिअर कॅमेरा असणार आहे. यामध्‍ये टेलिफोटो टेक्‍नॉलॉजीचा वापर करण्‍यात आला आहे. याच्‍या मदतीने कोणत्‍याही ऑब्‍जेक्‍टचे दोन फोटो फोनमध्‍ये सेव्‍ह होतील. ज्‍यामध्‍ये एक क्‍लोज-अप आणि दुसरा बॅकग्राउंडसोबत सेव्‍ह होईल. 

कंपनीने या स्‍मार्टफोनमधील कॅमे-याचे सॉफ्टवेअर आणखी अपडेट केले आहे. त्‍यामुळे युझर कमी प्रकाशात चांगले फोटो काढू शकेल आणि क्‍लोजअप फोटोही शार्प येतील. 

या स्‍मार्टफोनचे दुसरे वैशिष्‍ट्य म्‍हणजे यामध्‍ये पॉवरफुल ड्युअल LED फ्लॅश दिले आहे, जे लेझर ऑटोफोकससोबत असेल. एक कलर फ्लॅश असेल, ज्‍यामुळे फोटो नॅच्‍युरल कलरमध्‍ये येतील. सेल्फि लवर्ससाठी फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्‍सलचा देण्‍यात आला आहे. फ्रंट कॅमे-यातही फ्लॅश असणार आहे. 

Note 7 मध्‍ये लागली होती आग 
गॅलेक्‍सी नोट 8 हा सॅमसंगचा नवा फ्लॅगशिप मॉडेल आहे. मागील वर्षी गॅलेक्‍सी Note 7 च्‍या बॅटरींचा स्‍फोट घडण्‍याच्‍या घटना घडल्‍या होत्‍या. कंपनीला या मॉडेलला जगभरातून परत मागवण्‍याची नामुष्‍की ओढावली होती. कित्‍येक विमान कंपन्‍यांनी तर या फोनला सोबत घेऊन प्रवास करण्‍यावरही बंदी घातली होती. त्‍यामुळे ग्राहकांचा विश्‍वास पुन्‍हा जिंकण्‍याचे  आव्‍हान समॅसंगच्‍या या मॉडेलवर असणार आहे.  

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या...फोनच्‍या फिचर्सविषयी... 
 
बातम्या आणखी आहेत...