आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samsung Galaxy S4 Price Slashed To 17999 Rs In India

41500 चा गॅलेक्सी S4 आता केवळ 17999 रुपयांमध्ये, सॅमसंगने कमी केली किंमत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - सॅमसंग कंपनी 2013 लॉन्च केलेला फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S4 च्या किंमतीमध्ये मोठी कपात केली आहे. अधिकृतपणे आता सॅमसंग गॅलेक्सी S4 ची किंमत 17999 एवढी करण्यात आली आहे. यापूर्वी हा स्मार्टफोन 21900 रुपयांना मिळत होता. कंपनीने या फोनच्या किंमतीमध्ये 3900 रुपये कपात केली आहे. सॅमसंगने हा फोन 2013 मध्ये जेव्हा लॉन्च केला होता तेव्हा त्याची किंमत 41500 एवढी ठेवली होती.
मागील महिन्यात अँड्रॉईड लॉलीपॉप अपडेटची देण्यात आली होती सुविधा
मागील महिन्यात सॅमसंग गॅलेक्स S4 मध्ये अँड्रॉईड लॉलीपॉप 5.0 ऑपरेटिंग सिस्टम अपडेट कंपनीकडून लॉन्च करण्यात आली आहे. ही सुविधा कंपनीने गॅलेक्सी S4 अपडेट OTA (ओवर द एयर) तंत्रज्ञानाच्या साह्याने दिली आहे. युजर्सजवळ सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठीचे नोटीफिकेशन आपोआप आले होते. या अपडेटचे साईज 990 MB एवढे होते. या अपडेट नंतर नव्या लूकमध्ये गॅलेक्सी S4 एकदम चांगल्या परफॉमन्ससोबतच सिक्युरिटी आणि बॅटरी लाईफसुध्दा चांगल्या प्रकारे देईल.

1 मार्चला सॅमसंग कंपनी त्यांचा नवा गॅलेक्सी S6 फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या दरम्यान सॅमसंगच्या इतर फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, सॅमसंग गॅलेक्सी S4 चे फीचर्स-