आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंग गॅलेक्सी S6 एज प्लसचे फोटो आणि फिचर्स झाले Leak

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - सॅमसंगच्या गॅलेक्सी S6 आणि S6 एजची चर्चा अजून कमी होत होती न होती तेवढ्यात सॅमसंगच्या नव्या फोनबद्दल चर्चा सुरू झाली आहे. ट्वीटर onleaks ने आता सॅमसंग गॅलेक्सी S6 एज प्लसचे फोटो लिक केले आहेत. या लिक झालेल्या फोटो आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास onleaks नुसार हा फोन 154.45×75.80×6.85mm डायमेंशनचा असेल. याचा अर्थ हा फोन 5.5 इंचाचा असेल.

सॅमसंगच्या मागिल व्हेरिएंटचे साईट 5.1 इंच एवढा होता. सॅमसंग गॅलेक्सी S6 एज प्लसमध्ये ते कर्व्ह एजसुध्दा असतील जे सध्याच्या मॉडेलमध्ये आहेत.

सर्वात विशेष म्हणजे-
या फोनमध्ये सर्वात विशेष म्हणजे C टाइप USB पोर्ट. सॅमसंग गॅलेक्सी S6 एज प्लसमध्ये स्नॅपड्रॅगन 808 CPU देण्यात आला आहे. याशिवाय सॅमसंगचे स्वतःचे एक्सिनोस 7420 चिपसेट असेल.

नुकतेच आलेल्या सॅमसंग गॅलेक्सी नोट 5 च्या अहवालानुसार या फोनमध्येही USB 3.1 टाइप C पोर्ट असेल आणि स्क्रीन 5.89 इंचाची असेल. या लीक्सला पाहिल्यावर असे वाटते की, आता लवकरच C टाइप पोर्ट्स स्मार्टफोन्समध्ये सामान्य होऊन जातील.

पुढील स्लाईडवर पाहा, ट्वीटरवर लिक झालेले सॅमसंग गॅलेक्सी S6 एज प्लसचे फोटो...