आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SAMSUNG GALAXY NOTE 5 आणि S6 EDGE PLUS झाले लॉन्च, हायटेक फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅमसंगने न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका इव्हेंटमध्ये गॅलेक्सी सिरीजचे दोन नवे फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केले आहेत. त्यात एक गॅलेक्सी नोट 5 आणि दुसरा गॅलेक्सी S6 एज प्लस आहे. तसेच कंपनीने सॅमसंग पे देखिल लाँच केले आहे. 45 मिनियांच्या कार्यक्रमात कंपनीने या दोन्ही स्मार्टफोनमध्ये अॅड करण्यात आलेल्या नव्या फिचर्सबाबत माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात कंपनीचे सीईओ जॉन्ग-क्यूं शिन (Jong-Kyun Shin) यांनी केली. दोन्ही स्मार्टफोन कशाप्रकारे अधिक चांगले बनवण्यात आले आहेत, याची माहिती त्यांनी दिली.

इव्हेंटची सुरुवात जॉन्ग-क्यूं शिन यांनी केली. यापूर्वीच एका व्हिडीओद्वारे नोट आणि एज S6 चा प्रवास दाखवण्यात आला होता. तसेच कंपनीने कशाप्रकारे स्मार्टफोन हा कर्व्हड स्क्रीनबरोबर अधिक पॉवरफुल बनवला हेही सांगितले. त्यानंतर स्मार्टफोनच्या फीचर्ससाठी जस्टिन डेनिसन स्टेजवर आले.
सॅमसंगने यावेळी गॅलेक्सी नोट 5 आणि गॅलेक्सी S6 एज प्लसमध्ये अनेक फीचर्स सारखे ठेवले आहेत.

> 5.7 इंच स्क्रीन
> ऑक्टा-कोर Exynos प्रोसेसर
> 4GB रॅम
> 32GB इंटर्नल मेमरी
> 16 आणि 5 मेगापिक्सल कॅमेरा
> 3000mAh बॅटरी
सारखे स्क्रीन
कंपनीने यावेळी सॅमसंग नोट 5 हे गेल्या व्हर्जनच्या तुलनेत अधिक स्लिम असल्याचे सांगितले. म्हणजे नोट 4 च्या तुलनेत हा फोन जास्त स्लिम आहे. तसेच यात 5.7 इंचाचे स्क्रीन देण्यात आले आहे. कंपनीने सांगितले की, याची बॅटरी अधिक स्लिम करण्यात आली आहे. हेही हा फोन स्लिम असण्यामागचे एक कारण आहे. तर गॅलेक्सी S6 एज प्लस मध्येही 5.7 इंचाचे स्क्रीन देण्यात आले आहे. कंपनीने यावेळी मेटल आणि ग्लास अधिक मजबूत बनवले आहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या दोन्ही स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत...