आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Samsung ने लॉन्च केला सर्वात Slim स्मार्टफोन, वाचा फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Samsung Galaxy A8 - Divya Marathi
Samsung Galaxy A8
Samsungने आपला नवा स्मार्टफोन Galaxy A8 भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. या हँडसेटची किंमत 32,500 रुपये ठेवण्यात आली आहे. आतापर्यंतचा सर्वात सडपातळ (Slim)हँडसेट असल्याचा दावा कंपनीने केला आहे. क्वॉलकॉम प्रोसेसर आणि 16 मेगापिक्सल कॅमेरा तसेच हायटेक फीचर्सने हा फोन अद्ययावत आहे.

Samsungने हा हॅंडसेट जुलै महिन्यात चीनमध्ये लॉन्च केला होता. या हँडसेटची जाडी 5.9 mm आहे. दरम्यान, कंपनीचा हा सर्वात सडपातळ हँडसेट आहे. मात्र, इतर कंपन्यांचे सडपातळ हँडसेट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. Gioneeचा Elife 7 या हँडसेटची जाडी 5.5 mm इतकी आहे. त्याचप्रमाणे Oppo R5 हा हँडसेट 4.85 mm बारीक आहे. Vivo X5Maxची बॉडी 4.75 mm इतकी जाड आहे.
Samsung Galaxy A8 चे खास वैशिष्ट्ये...
> 5.7 इंच स्क्रीन
> फुल HD डिस्प्ले
> 16 मेगापिक्सल कॅमेरा
> फिंगरप्रिंट सेंसर
> 16/32 GB रॅम व्हेरिएंट
> 5.9 mm जाड मेटल बॉडी
> शानदार बॅटरी बॅकअप
Samsung Galaxy A8 चे फीचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...