आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एप्रिलमध्ये लॉन्च झालेत हे 5 Smartphones, किंतम 5000 रुपयांच्या आत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क: मागील महिना (एप्रिल) भारतीय मोबाइल मार्केटसाठी चांगले ठरले. या महिन्यात अनेक कंपन्यांनी त्यांचे नवे स्मार्टफोन या महिन्यात बाजारात उतरवले. यामध्ये इंटेक्स, लेनोवो, मायक्रोसॉफ्ट, मायक्रोमॅक्ससमवेत अनेक कंपन्यांनी त्यांचे स्मार्टफोन भारतीय युजर्सला लक्षात घेऊन बाजारात उतरवले. यामधील जास्तकरून फोन हे लोबजेट स्मार्टफोनमधीलच असून त्यांची किंमत 5000 रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. Divyamarathi.com आज तुम्हाला अशाच पाच स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहे. जे तुमच्यासाठी आणि तुमच्या खिशासाठी दोघांसाठीही चांगला पर्याय आहे.

इंटेक्स एक्वा Y2
किंमत : 5,190 रुपये

इंटेक्स एक्वा Y2 मध्ये अँड्रॉईड किटकॅट 4.4.2 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले आहे. हा ड्यूअलसिम स्मार्टफोनमध्ये 4 इंचाची स्क्रीन देण्यात आली असून यातून 480*800 पिक्सलचे रेझोल्यूशन मिळते. म्हणजेच उन्हात या स्मार्टफोनचा स्क्रीन डिस्प्ले एवढा दिसत नाही. 1.2 GHz क्वाड-कोर प्रोसेसरसोबतच या फोनमध्ये 1GB रॅम देण्यात आली आहे. या फोनमध्ये 8GB इंटरनल मेमरी देण्यात आली असून मेमरी कार्डच्या साह्याने ही 64GB पर्यंत वाढवता येऊ शकते.

कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 8 मेगापिक्सलचा रेअर कॅमेरा LED फ्लॅशसोबत देण्यात आला आहे. तर फ्रन्ट कॅमेरा 2 मेगापिक्सल क्षमतेचा आहे. इंटेक्सच्या या स्मार्टफोनमध्ये 1400mAh बॅटरी क्षमता देण्यात आली आहे, तर कनेक्टीव्हीटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ, GPS, GPRS, 3G आणि मायक्रो यूएसबी यांसारखे कनेक्टीव्हीटी ऑप्शन देण्यात आले आहे.

पुढील स्लाईडमध्ये पाहा, एप्रिलमध्ये लॉन्च झालेल्या लोबजेट स्मार्टफोन्सबद्दल, ज्यांची किंमत 5 हजाररुपयांपर्यंत आहे...