आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smartphones Costing Less With 2GB Ram In Indian Market

हे आहेत 2GB रॅम असलेले भारतीय मार्केटमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - भारतीय मार्केटमध्ये असे अनेक स्मार्टफोन्स आहेत ज्यामध्ये 2GB अथवा त्यापेक्षा जास्त रॅम उपलब्ध आहे. हे स्मार्टफोन फास्ट असण्यासोबतच युजर्ससाठी एक चांगली पसंत असतात. यातील जास्त स्मार्टफोन्स 15000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे आहेत. तर काही व्हेरिएंट्स 11000 रुपयांपेक्षा कमी दरामध्ये मिळतात. Divyamarahi.com आज तुम्हाला सांगणार आहे अशाच 11000 रुपायांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्मार्टफोन्सबद्दल ज्यांच्यामध्ये आहे 2GB रॅम...
Asus Zenfone 5
किंमत- 9,926 रुपये (2GB रॅम आणि 16GB मेमरी व्हेरिएंट)
7,999 रुपये (2GB रॅम आणि 8GB मेमरी व्हेरिएंट)
असूसच्या या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. ही स्क्रीन एचडी डिस्प्ले क्वालिटी (720*1280 पिक्सलचे रेजोल्यूशन) देते. या फोनच्या स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. हा फोन अँड्रॉईड जेलीबीन 4.3 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो आणि हा फोन अँड्रॉइड 4.4.2 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टमने अपग्रेड करता येते. या फोनमध्ये इंटेल एटम 2GHz चे ड्युअल कोर प्रोसेसर देण्यात आले आहे.
या फोनमध्ये 8 आणि 16 GB इंटरनल मेमरी असे दोन व्हेरिएंट देण्यात आले आहे. यामध्ये 1 GB आणि 2GB रॅमचे व्हेरिएंटसुध्दा उपलब्ध आहेत. 8 मेगापिक्सल रेअर कॅमेऱ्यासोबतच या फोनमध्ये 2 मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 2110 mAh बॅटरीसोबत येतो. ज्यामध्ये कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा फोन 18 तास आणि 30 मिनिटांचे टॉकटाईम देतो.
पुढील स्लाईडवर पाहा, इतर स्मार्टफोन्सबद्दल...