आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solar Paper Is A World\'s First Paper Thin Solar Charger

VIDEO: कागदापेक्षाही पातळ आहे हे \'सोलर पेपर चार्जर\', बॅटरी करतो झटपट चार्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'गॅजेट वर्ल्ड'मध्ये केव्हा काय लॉन्च होईल, हे सांगता येत नाही. आता हेच बघा ना, कागदापेक्षाही पातळ चार्जर लवकरच बाजारात लॉन्च होणार आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. मात्र, हे खरे आहे. एका कंपनीने कागदापेक्षाही पातळ 'सोलर चार्जर' बनवल्याचा दावा केला आहे. 'सोलर पेपर' असे या चार्जरला नाव दिले आहे. एक डॉलरच्या नोटेइतकी या चार्जरची लांबी आहे. सोलर पेपर चार्जर 2.5-10 वॅट विद्युत निर्मिती करते.
सोलर पेपर चार्जरचे वैशिष्‍ट्ये...
* फोल्डेबल असल्याने सहज खिशात ठेवता येते.
* 2.5 तासांत आयफोनची बॅटरी फूल चार्ज
* वजन फक्त 60 ग्रॅम
चार्जिंगसाठी पेपर चार्जरमध्ये USB पोर्ट देण्यात आला आहे. फोन, आयपॅड आणि अन्य दुसरे इतर गॅजेट्‍स देखील या चार्जरवर चार्ज करता येतात. विशेष म्हणजे हे चार्जर फोल्डेबल आहे. त्यामुळे चार्जरची घडी करून ते सहज खिशात ठेवता येते. कमी उन्हातही हे चार्जर 2.5-10 वॅट विद्युत निर्मिती करते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा 'पेपर चार्जर'विषयी...