आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल कीबोर्डमधील स्पेसबार हटवण्याची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - लॅपटॉप निर्माता कंपन्या लॅपटॉपमध्ये देण्यात आलेला अतिरिक्त स्पेस कमी करण्याच्या योजनेवर काम करत आहेत. त्यासाठी कीबोर्डवरील बटणांमध्ये देण्यात आलेला स्पेस कमी करण्याचा त्यांचा पहिला प्रयत्न आहे. याशिवाय निरर्थक जागा अडवून बसलेले काही कीवर्डदेखील बदलण्याचा कंपन्यांचा विचार आहे.

मात्र गुगलने यासंदर्भात वेगळाच मार्ग अवलंबला आहे. कंपनीने एका नव्या डिझाइनच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. त्याचा विचार भविष्यात नोटबुक कॉम्प्युटरसाठी करण्याचा कंपनीचा विचार आहे. तंत्रज्ञानावर आधारित वेबसाइट क्वार्ट््झने दिलेल्या माहितीनुसार या पेटंटचा उपयोग गुगल कंपनी भविष्यात छोटे लॅपटॉप्स तयार करण्यासाठी करणार आहे. कंपनीने त्याची तयारी सुरू केली आहे. क्वार्ट््झच्या अहवालानुसार पेटंट ऑफिसने याआधी चार वर्षांपूर्वी अशा स्वरूपाचे डिझाइन खारीज केले होते. त्यानंतर कंपनीने त्यात अनेक बदल केले आहेत व त्यानंतर हे डिझाइन पुन्हा एकदा पेटंट करण्यासाठी पाठवण्यात आले आहे.
असे असतील बदल : नव्या डिझाइनमध्ये गुगलने कीबोर्डवरील स्पेसबार हटवला आहे. सोबतच त्याच्या जागी टचपॅड देण्यात आले आहे. माऊसच्या फंक्शन स्वरूपात वापरले जाणारे बटणदेखील थोडेसे वरच्या बाजूला देण्यात आले आहे.

जीमेल सेफ करण्यासाठी पासवर्ड अलर्ट जारी
गुगलने आपल्या क्रोम ब्राऊझरसाठी एक फ्री एक्स्टेन्शन लाँच केले आहे. ज्यामुळे तुम्ही गुगल अकाउंट्स व ई-मेल्स ऑनलाइन हल्लेखोरांपासून सुरक्षित ठेवू शकाल. यामुळे तुमचे पासवर्ड््स व इतर वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करताच त्याचा अलर्ट तुम्हाला मिळेल. गुगल अकाउंट्स सेफ करणा-या या एक्स्टेन्शनचे नाव पासवर्ड अलर्ट असे ठेवण्यात आले आहे. गुगल क्रोमवरून ते डाऊनलोड करता येऊ शकते. हे एक्स्टेन्शन तयार करण्यासाठी कंपनीला तीन वर्षे लागली.
आठ वर्षांनी मिळणार नाही इंटरनेटवर डाटा
इंटरनेटवर सध्याचा वाढता दबाव लक्षात घेता भविष्यात इंटरनेटच्या वापरावर एकही डाटा मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार भविष्यात आणखी आठ वर्षांनी तशी परिस्थिती उद््भवू शकते. इंटरनेटच्या डाऊनलोडिंगची स्पीड आता आणखी वाढवली जाऊ शकत नाही. या समस्येवर विचार करण्यासाठी लंडनच्या रॉयल सोसायटीने या महिनाअखेरीस इंटरनेट तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे. त्यात या आव्हानावर चर्चा हाेणार आहे. युजर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचा दबाव इंटरनेट सेवेवर येतो आहे. आगामी काळात तो वाढत जाईल. त्यामुळे सेवेचा वेग कमी होईल व माहिती, सेवा विलंबाने िमळतील.
सध्या अशी परिस्थिती
२००५ मध्ये ब्रॉडबँडची कमाल इंटरनेट स्पीड दोन मेगाबाइट्स प्रतिसेकंद होती. सध्या हा वेग वाढून १०० एमबी प्रतिसेकंद झाला आहे.

नेट सेवेवर परिणाम
लॅपटॉप व स्मार्टफोनवर प्रत्येक माहिती उपलब्ध करणा-या केबल फायबर ऑप्टिकल्सचा क्षमतेपेक्षा जास्त उपयोग होतोय. तज्ज्ञांच्या दाव्यानुसार एक लेअरच्या फायबर ऑप्टिकल्स आता जास्त डाटा उपलब्ध करून देण्यास अक्षम. इंटरनेट कंपन्यांना अतिरिक्त केबलचे जाळे तयार करण्याची सूचना. केबलचे जाळे विस्तारले तर त्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार.