नवी दिल्ली- तमिळ, तेलगु आणि हिंदी सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री तापसी पन्नू ही आता बिझनेसवुमन बनली आहे. तिने स्वत:चा बिझनेस सुरु केला आहे. आतापर्यंत तब्बल 17 सिनेमांमध्ये काम केलेल्या तापसी हिने इच्छूक वर-वधूंचे लग्न लावून देणार आहे. अर्थात तापसीने बहिण आणि मैत्रिणीसोबत 'दी वेडिंग फॅक्टरी' नामक एक कंपनी सुरु केली आहे. ही कंपनी खास पद्धतीने इव्हेंट प्लान करते. आपल्या ग्राहकांना यूनीक सर्व्हिस देण्याचा दावा 'दी वेडिंग फॅक्टरी'ने दावा केला आहे.
'दी वेडिंग फॅक्टरी'
'द वेडिंग फॅक्टरी' ही एक इव्हेंट प्लान कंपनी आहे. अभिनेत्री तापसी पन्नू हिने बहिण शगुन पन्नू आणि मैत्रिण फराह परवरेश हिच्यासोबत सुरु केली आहे. ग्राहकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. यासोबत इव्हेंटसाठी जागा ऑन डिमांड उपलब्ध करून दिली जाईल. या कंपनीने आतापर्यंत अनेक इव्हेंट ऑर्गनाइज्ड केले आहेत.
'वेडिंग प्लानर'च्या रुपात ग्राहकांच्या बजेटमध्ये चांगली सर्व्हिस देण्यावर तिघींचा भर राहाणार आहे. डेस्टीनेशन वेडिंगची सुविधा देखील कंपनीने सुरु केली आहे.
या सर्व्हिस देते तापसीची कंपनी
> अपेरल्स अॅड एक्सेसरीज
> ब्यूटी अॅण्ड ग्रूमिंग
> केटरिंग
> डेकोरेशन
> इंटरटेनमेंट
> हॉटेल
> पाहुण्यांना आमंत्रित करणे
> ज्वेलरी
> व्हेन्यू
> फोटोग्राफी/व्हिडिओग्राफी
> हनीमून पॅकेज
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, तापसी, शगुन आणि फराहच्या करियरविषयी...