आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Today\'s Apple Event Could Be 7 New Products Launch

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Apple चे हे 7 प्रॉडक्‍ट्स आज होऊ शकतात लॉंन्‍च, जाणून घ्‍या त्‍याविषयी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Apple कंपनी आज (9 सप्‍टेंबर रोजी) लेटेस्‍ट आयफोन लॉंन्‍च करणार आहे. सँन फ्रांसिस्‍को येथे भ्‍ाारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता एका इव्‍हेंटमध्‍ये कंपनी आपले विविध गॅझेट्स लॉंन्‍च करणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये कंपनी कोणते व किती आयफोन लॉंन्‍च करणार याविषयी उत्‍सुकता युजर्सला आहे. तर आम्‍ही आपल्‍याला आज लॉंन्‍च हाेणा-या Apple कंपनीच्‍या गॅझेट्स विषयी महिती देत आहोत.
हे प्रॉडक्‍ट होऊ शकतात लॉन्‍च
Apple कंपनी आज कोणते प्रॉडक्‍ट लॉंन्‍च करणार, या विषयी माहीती दिली नाही. परंतु एका रिपोर्टनुसार आयफोन 6S (आयफोन 7 अध्‍याप निश्चित झाले नाहीत) 6S plus, Apple TV 2, iOS 9 हे प्रॉडक्‍ट आज लॉंन्‍च होण्‍याची दाट शक्‍यता आहे. तसेच इव्‍हेंटमध्‍ये कंपनी न‍वीन आयपॅडची घोषणा देखील करू शकते.
आयफोन 6 सारखी असू शकते 6S आयफोनची डिझाइन
आयफोन 6S आयफोन अॅल्यूमिनियम प्रीमियम डिझाइनमध्‍ये असल्‍याची माहिती लीक झाली आहे.
* आयफोन 6 सारखी मिळती-जुळती डिझाइन
* बेझल (स्क्रीनची साइड बॉडी) स्लिम आहे.
* अॅझ टू अॅझ स्क्रीन, आकर्षक दिसेल
* टच आय डी आणि होम बटन होम स्क्रीनवर असेल
* बॅक साइडवर कॅमेरा प्लेसमेंट आणि सेन्‍सर डिझाइनमध्‍ये बदल असेल
*Sapphire glass चा डिस्प्ले
कंपनी आयफोन 6s मध्‍ये 5.5 इंचाचा डिस्प्ले देऊ शकते. जे QHD (20000 पिक्सल) रेझाेल्यूशन क्वाॅलिटी देते. डिस्प्लेमध्‍ये sapphire glass चा वापर करण्‍यात आला आहे. जे की, कंपनीने पहिल्‍यांदा Apple वॉचमध्‍ये वापरले होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा आज लॉन्‍च होणा-या Apple च्‍या प्रॉडक्‍ट्सविषयी माहिती...
नोट- आज रात्री लॉन्‍च होणा-या प्रॉडक्‍टविषयी कंपनीने अध्‍याप माहिती दिलेली नाही.