सध्याच्या गतीमान युगात घडणारी गोष्ट जाणून घेण्याची प्रत्येकालाच ओढ लागलेली आहे. लोक तासांतास ऑनलाइन असतात. विरंगुळा म्हणून मनोरंजनासाठी तसेच एखाद्या घटनेचा व्हिडिओ पाहाण्यासाठी 'Youtube' सारख्या वेबसाइटचा वापर करतात. मात्र, Youtube शिवाय अशा अनेक वेबसाइट्स आहेत की, त्यांचा वापर ऑनलाइन 'फ्री व्हिडिओ पाहाण्यासाठी देखील करता येईल.
1. Dailymotion
'Dailymotion' या वेबसाइटवर भारतीय तसेच विदेशी टीव्ही शो आणि सिनेमे पाहाता येतात. ही एक फ्रेंच वेबसाइट असून जगभरात 18 भाषांमध्ये उपलब्ध आहे. युजर्सला त्याच्या लोकेशननुसार 'होम पेज'वर त्याच्या रिजनचे व्हिडिओ बघायला मिळतात. विशेष म्हणजे युजर या वेबसाइटवर आपला एखादा व्हिडिओ अपलोड करू शकतो. मात्र, यासाठी व्हिडिओ 2GB असून त्याची क्वॉलिटी HD (1280X720 पिक्सल रेझोल्युशन) आणि 60 मिनिटांचा असावा.
पुढील स्लाइड्सवा क्लिक करून जाणून घ्या, अन्य फ्री व्हिडिओ वेबसाइट्सविषयी...