आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tricks You Did Not Know Your Smartphone Could Do

TIPS: करा स्मार्टफोनच्या साह्याने ही 5 कामे, कदाचित तुम्ही याचा विचारही केला नसेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क: तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का? जर आहे, तर तुम्ही त्याने काय काय करता. कॉलिंग, चॅटींग, मॅसेजिंक, इंटरनेट अथवा इतर दुसरी कामे. मात्र स्मार्टफोनमध्ये काही असेही फीचर्स असतात, ज्यांच्याबदद्ल तुम्हाला कदाचित माहितीसुध्दा नसेल. या फीचर्सच्या साह्याने अनेक अवघड कामे सोपी होतात. जसे की, फोटो काढणे, मुव्ही प्रोजेक्टर बनवणे, रिमोट चेक करणे, मल्टीपल पॅनोरामा शॉट्स काढणे, हाय क्वालिटी लेंस बनवणे, साऊंड क्वालिटी वाढवणे यांसारखे अनेक कामे स्मार्टफोनच्या साह्याने करता येतात.

टीव्ही अथवा इतर रिमोट चेक करणे.
टीव्ही, स्पीकर, DVD प्लेयर अथवा इतर डिव्हाईसचे जेव्हा रिमोट खराब होतो, तेव्हा सामान्यतः आपण त्याचे सेल बदलून तो चालू आहे की नाही हे चेक करतो. मात्र अनेकवेळा सेल बदलूनसुध्दा समाधान होत नाही, अशा वेळी रिमोट निट आहे की नाही याचा अंदाज लावणे कठीण होते. मात्र तुमचा स्मार्टफोन ही समस्या एका क्षणात सोडवू शकतो. म्हणजेच तुमचा स्मार्टफोन तुम्हाला सांगेल की, तुमचा रिमोट काम करतो की नाही.

रिमोट चालू आहे की नाही हे शोधण्यासाठी तुम्हाला रिमोटचे सेंटर तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यासमोर ठेवून रिमोटचे बटन दाबावे लागतील. असे केल्याने रिमोटच्या सेंसमध्ये लाईट ब्लिंक करताना दिसेल. मात्र याला तुम्ही कॅमेऱ्याशिवाय पाहू शकत नाही. जर सेंसरमध्ये लाईट ब्लिंक करत असेल, तर तुमचे रिमोठ ठिकठाक आहे असे समजावे.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर टीप्सबद्दल, ज्यामध्ये तुमचा स्मार्टफोन तुम्हाला मदत करेल