आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनब्रेकेबल अॅण्ड वॉटरप्रूफ: स्टीलपेक्षाही दणकट आहे हा हायटेक स्मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेक वर्ल्डमध्ये जबरदस्त स्मार्टफोन दाखल होणार आहे. हायटेक फीचर्ससह हा फोन अनब्रेकेबल आणि वॉटरप्रूफ आहे. सॅन फ्रान्सिस्को येथील एक रोबोटिक कंपनीने या स्मार्टफोनची निर्मिती केली आहे. ट्यूरिंग (Turing) असे या मॉडेलचे नाव आहे. फोन बनवण्यासाठी एक स्पेशल मटेरियल वापरण्यात आले आहे. ते अनब्रेकेबल आहे. विशेष म्हणजे हा फोन कोणी हॅक करू शकणार नाही. 31 जुलैपासून या फोनची प्री-बुकिंग सुरु होणार आहे.
ट्‍यूरिंगचे वैशिष्ट्ये...
> अनब्रेकेबल आणि वॉटरप्रूफ
> लिक्विडमोर्फियम मटेरियल
> 16/32/64GB मेमरी व्हेरिएंट
> 13 मेगापिक्सल कॅमेरा

ट्‍यूरिंगचे फीचर्स:
वेबसाइट Wired.comच्या अहवालानुसार, रोबोटिक कंपनीने या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट रीडरचा वापर केला आहे. मात्र, 5.5 इंचाच्या डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये USB पोर्ट आणि हेडफोन जॅक पोर्ट नसेल. फोनची बॉडी लिक्विडमोर्फियमपासून (liquidmorphium) तयार करण्यात आली आहे. बॉडी अॅल्युमिनियम आणि स्टीलपेक्षा दणकट असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
अॅपलने iphone 6च्या बॉडीत लिक्विडमोर्फियमचा वापर केला होता. मात्र, अॅपलने लिक्विमोर्फियमचा कमी प्रमाणात वापर केला आहे. याशिवाय फोनला वॉटरप्रूफ बनवण्यासाठी इंटरनल पार्ट्सवर नॅनो कोटिंग करण्‍यात आले आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे रबर वापरण्यात आलेले नाही. सर्व पार्ट सहज उघडू शकतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा 'ट्यरिंग' स्मार्टफोनचे इतर फीचर्स...