आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त टि्वटवर आता कारवाई , टि्वटरची चिमणी झाली 10 वर्षांची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टि्वटरची चिमणी आता १० वर्षांची झाली आहे. याचा जन्म २१ मार्च २००६ रोजी झाला होता. या १० वर्षांत याचे रंग-रूप चार वेळा बदलले आहे आणि सध्या हे उच्च श्रेणीत आहे. जग-देशातील माहितीसाठी टि्वटर एक महत्त्वाचे साधन बनले आहे. प्रत्येकासाठी टि्वटर एक उत्तम माध्यम बनले आहे. मात्र, काही टि्वटमुळे लोक नाराज होतात. नकारात्मकता त्यातून पसरते व सामाजिक वातावरण गढूळ होते. अशा स्वरूपाची प्रकरणे टि्वटर कसे हाताळते हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न. टि्वटरचे दक्षिण आशियाचे प्रसार माध्यम उपाध्यक्ष ऋषी जेटली यांच्याशी ई-मेलद्वारे साधलेला संवाद.

> अनेकदा असे आढळून आले आहे की, काही टि्वट्समुळे वाद निर्माण होतो. याच्या नियंत्रणासाठी टि्वटरचे काही धोरण आहे का? की हे पूर्णपणे स्वतंत्र आहे?
- या माध्यमातून टाकण्यात येणाऱ्या कसल्याही स्वरूपाच्या माहितीसाठी वापरकर्ताच जबाबदार असतो. आम्ही त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करतो. मात्र, अशा स्वरूपाच्या माहितीवरील नियंत्रणासाठी आमच्याकडे काही साधने (टूल्स) आहेत. एखाद्या टि्वटबाबत आक्षेप असतील तर तक्रार करावी. त्याची तपासणी करू. समजा नियमांचे उल्लंघन झाले असेल तर तो मजकूर आम्ही हटवतो. ते खाते बंद करतो.
> अनेकदा या माध्यमाचा वापर राष्ट्रहितविरोधी किंवा अनधिकृत माहितीसाठी होतो. सरकार या नियंत्रणासाठी सांगते तेव्हा काय पावले टाकली जातात?
- सरकारशी आमची काय चर्चा होते, हे उघड करता येणार नाही. मात्र, दहशतवादाच्या प्रसारासाठी टि्वटरचा वापर कदापि होणार नाही याबाबत आम्ही सातत्याने दक्षता घेतो. हे आम्ही कधीच सहन करत नाही. मागील वर्षी आयएसआयएसशी संबंधित सव्वा लाखाहून जास्त खाती आम्ही बंद केली.

> पंतप्रधान नरेंद्र मोदी टि्वटरचा प्रभावी वापर करत आहेत. यामुळे टि्वटरलाही फायदा झाला आहे. अशा स्थितीत टि्वटरची नवख्या खातेदारांसाठी प्रशिक्षण किंवा कार्यशाळेची योजना आहे का?
- लाेकांना उपयुक्त आणि एकमेकांना जोडणारा मजकूर यावर आमचा नेहमीच भर असतो. यासाठी आम्ही राजकीय नेते, क्रिकेटपटू, नामांकित व्यक्ती यांच्यासोबत काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्यासाठी सर्वात शक्तिशाली भारतीय वापरकर्ते आहेत. डिजिटल इंडिया अभियान हे याचे उत्तम उदाहरण आहे.
> सरकारने कधी एखादे टि्वट किंवा खाते हटवण्यास सांगितले का?
- २०१५ मध्ये भारत सरकारच्या विविध संस्था आणि पोलिसांकडून ७० टि्वट हटवण्याबाबत विनंती करण्यात आली, तर तीन खाती हटवण्यासाठी न्यायालयाने आदेश दिले होते.
> ज्यांना इंग्रजी समजत नाही, अशांसाठी काय पावले टाकली?
- आम्ही २०१४ मध्ये हिंदी, बांगला आणि जुलै २०१५ मध्ये गुजराती, कन्नड, तामीळ आणि मराठी या भाषा टि्वटरशी जोडल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...