आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13MP कॅमेरा, HD डिस्प्ले, दणकट बॉडीचा स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी Umi ने भारतीय बाजारात आपला 4G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Umi Hammer ई-कॉमर्स शॉपिंग वेबसाइट 'फ्लिपकार्ट'वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या फोनची किंमत 10,999 रुपये आहे. भारतीय बाजारात लॉन्च झालेला हा Umiचा पहिला स्मार्टफोन आहे.

भारतीय बाजारात असलेल्या सर्व स्मार्टफोन्सच्या तुलनेत Umi Hammer हा फोन दणकट आहे. यात एव्हियेशन एलॉय फ्रेमचा वापर करण्‍यात आला आहे. 4.3mm इतकी या फोनची जाडी आहे. Umi Hammerचे रियर पॅनल पॉलिकार्बोनेट मटेरियलपासून बनवले आहे. याशिवाय कंपनीने यात 4G फीचर्ससह हायटेक कॅमेरा दिला आहे.

Umi Hammerचे फीचर्स-
> ड्युअल सिम
> अँड्रॉइड 4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम. त्याच बरोबर अँड्राइड 5.0 लॉलीपॉपने अपग्रेड करता येइल.
> ड्युअल ग्लास असलेला 5 इंचाचा HD (720x1280 पिक्सल रेझोल्युशन) IPS डिस्प्ले
> कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे स्क्रीन प्रोटेक्शन
> 1.5GHz क्वॉड-कोअर मीडियाटेक (MT6732) प्रोसेसर
> 2GB रॅम
> ग्राफिक्ससाठी माली-T760 GPU
> 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा विथ ड्युअल LED फ्लॅश
> 3.2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
> 16GB इंटरनल मेमरी. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 64GB पर्यंत वाढवता येईल.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, Umi Hammerचे इतर फीचर्स...