नवी दिल्ली- टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने जिओला टक्कर देण्यासाठी 'सुपरअवर' ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरनुसार व्होडाफोन ग्राहकांना 16 रुपयांच्या रिचार्जवर एका तासासाठी अनलिमीटेड 3G किंवा 4G डेटा मिळेल. त्याच बरोबर 7 रुपयाच्या रिचार्जवर अनलिमिटेड व्हॉइस कॉल पॅकही व्होडाफोनने सादर केला आहे. याची व्हॅलिडिटी एक तास असेल. या व्यतिरिक्त 2G ग्राहकांसाठीदेखिल अनेक ऑफर्स व्होडाफोनने सादर केल्या आहेत.
एका तासात कितीही डेटा वापरा
सुपरअवर ऑफरचा वापर करुन एका तासात कितीही डेटा वापरु शकता किंवा डाऊनलोड करु शकता अशी माहिती व्होडाफोन इंडियाचे चीफ कमर्शिअल ऑफिसर संदीप कटारिया यांनी दिली आहे. या व्यतिरिक्त व्होडाफोनच्या ग्राहकांना एक तास बोलण्यासाठी केवळ 7 रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे.
पुढील स्लाइडवर वाचा काय आहे स्किम...