आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Walkcar You Can Carry This Portable Car In Your Bag

Gadget World:आपल्या हॅंडबॅगमध्ये बसू शकते ही पोर्टेबल कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जापानी कंपनी 'कोकोआ मोटर्स'ने नुकतीच एका पोर्टेबल कारची निर्मिती केली आहे. उल्लेखनिय म्हणजे ही कार आपल्या बॅकपॅकमध्ये सहज बसू शकते.

'डेली मेल'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'Walkcar'असे या पोर्टेबल कारचे नाव आहे. तीन तासांच्या चार्जिंगवर ही कार 12 किलोमीटर धावते तर कारचा वेग ताशी 10 किलो मीटर आहे. कुनियाको साइटो (26) आणि त्याच्या टीमने नुकतीच ही कार लॉन्च केली आहे. कारचा आकार लॅपटॉप एवढा असून ती स्केटबोर्ड सारखी दिसते.
120 किलोग्रॅम वजन वाहून नेण्याची या कारमध्ये क्षमता आहे. चालक कारवर उभा राहाताच ती धावू लागते. तसेच चालक खाली उतरला असता ती ऑटोमॅटीक बंद होते. कार चालकाला पार्किंग स्पेस शोधण्याची आवशक्यता भासत नाही. कारण ती तुमच्या हॅंडबॅगमध्ये सहज बसू शकते.

Walkcar लवकरच ऑनलाइन वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. कारची किंमत 800 डॉलर्स अर्थात 52,000 रुपये असू शकते.

पुढील स्लाइडवर पाहा, पोर्टेबल Walkcar चे फोटो..