आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Watch! Yahoo CEO Marissa Mayer Lifestyle In Photos

12 लाखांचे घड्याळ, 2 लाखांची बॅग, लक्झरी आहे या CEO ची लाइफस्टाइल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याहू (Yahoo!) च्या CEO मारिसा मेयर आज 40 वा वाढदिवस साजर करत आहेत. त्यांचा जन्म 30 मे 1975 रोजी यूएसमध्ये झाला होता. मारिसा सध्या कंपनीच्या प्रेसिडेंट म्हणूनही काम पाहात आहेत. आकाशाला गवसणी घालणारे यश मिळवणारी ही महिला कॉर्पोरेट कॅलिफोर्नियातील सॅन फ्रॅन्सिस्को शहरात राहाते. कपडे, वॉच, ज्वेलरी तिच्या लाइफस्टाइलचा अविभाज्य भाग बनल्या आहेत.

मारिसाच्या मित्र परिवारातील हॉलीवूड अॅक्ट्रेस ईव्हा लोंगोरिया आणि कॅमरून डियाज यांनी वोग्स मध्ये दिलेल्या एका मुलखतीत मारिसाच्या लक्झरी लाइफच्या काही निवडक गोष्टी शेअर केल्या होत्या. त्यानूसार, मारिसाने मित्रांना भेट देण्यासाठी 20 कश्मीरी कार्डिगन्स खरेदी केल्या होत्या, त्या प्रत्येकाची किंमत 1,72296 रुपये होती. मारिसा ओमेगा डे विले ब्रँडचे घड्याळ वापरते. सोन्याची ही घड्याळ 20 हजार डॉलर अर्थात 12,76268 रुपयांची आहे. एवढेच नाही, मारिस पती जॅक ब्रॉगसोबत ज्या घरात राहाते त्याची किंमत 35 मिलियन डॉलर म्हणजे तब्बल 223 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. तिच्या डेली अॅक्सेसरीजही लक्झरी असतात. तिची ब्लॅक हँडबॅग देखील हजारो डॉलरची (4 हजार डॉलर अर्थात 2,55253 रुपये) आहे.
डांसिंगची आवड
मारिसा क्लासिकल बॅले डांसर आहे. वोग्सच्या वृत्तानूसार तिला लहानपणापासून डांसिंगची आवड आहे. आज चाळीशीत असलेली मारिसा अजूनही आठवड्यात 35 तास डांस करते. त्यामुळेच की काय अजूनही ती फिट दिसते.
गुगल पासून याहू पर्यंत
मारिसाचा प्रवास भन्नाट आहे. तिने गुगल मॅप्स, गुगल अर्थ, जॅगट, स्ट्रीट व्ह्यू यांसह स्थानिक आणि भौगोलिक उत्पादनांशी संबंधीत क्षेत्रात काम केले आहे. 2014 मध्ये फॉर्च्यून अंडर 40 च्या यादीत मारिसा 6व्या क्रमांकावर होती. एवढेच नाही तर, तिची जगातील पॉवरफूल वूमनच्या यादीतही निवड झाली होती. गेल्या पाच वर्षांची तिची सॅलरी 117 मिलियन डॉलर म्हणजे 746 कोटी 81 लाख रुपये होती. काही वर्षांपासून ती याहूसोबत आहे.
पर्सनल लाइफ
मारिसा मेयरचा विवाह जॅक ब्रॉगसोबत 12 डिसेंबर 2009 मध्ये झाला. या दाम्पत्याला एक मुलगा आहे. त्याचे नाव मॅकलिस्टर आहे. 30 सप्टेंबर 2012 ला त्याचा जन्म झाला. ऑफिस संपल्यानतंर तिचा पूर्ण वेळ हा मुलासाठी आहे. मात्र एक गोष्ट तिने मुलापासून दूर ठेवली आहे, ती म्हणजे मीडिया.
पुढील स्लाइडवर पाहा मारिसा मेयरची लक्झरी लाइफस्टाइल