आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता व्हिडिओ कॉलिंग सुरु असताना चॅटही करु शकता, जाणुन घ्‍या व्‍हॉट्सअॅपचे 2 नवे फिचर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकप्रिय मॅसेजिंग अॅप व्‍हॉट्सअॅप 2 नवे फिचर्स आपल्‍या युझर्ससाठी घेऊन आले आहे. अपडेटद्वारे हे फिचर्स युझर्संना‍ दिले जाणार आहेत. हे असे फिचर्स आहेत ज्‍याची खरेतर अनेक वेळेपासून मागणी करण्‍यात येत होती. एका फिचरद्वारे Picture-in-Picture व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे. तर दुस-या फिचरद्वारे युझर टेक्‍स्‍टला कलर देऊ शकणार आहेत. विशेष म्‍हणजे हे दोन्‍ही फिचर अँड्रॉईड आणि आयओएस युझर्स वापरु शकणार आहे. आश्‍यचर्य म्‍हणजे बीटा युझर्ससाठीही हे फिचर्स उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहेत. 

असे काम करेल Picture-in-Picture फिचर 
- हे फिचर मल्‍टी टास्कींग म्‍हणजे एकाच वेळी अनेक कामे करता यावीत यासाठी बनविण्‍यात आले आहे.  
- या फिचरद्वारे तुम्‍ही व्हिडिओ कॉलिंगसोबतच दुस-या कुणासोबत चॅटही करु शकता. 
- वापरण्‍यासाठी हे अतिशय इंटरेस्‍टींग असे फिचर असणार आहे. कारण यामध्‍ये तुम्‍ही व्हिडिओ कॉलिंगची स्‍क्रीन छोटी करुन तिला मोबाईलच्‍या स्‍क्रीनवर कुठेही ड्रॅग करु शकता.  आणि व्हिडिओ कॉलिंग सुरु असतानाच चॅटही करु शकता. 

असे आहे दुसरे फिचर
- दुस-या फिचरद्वारे तुम्‍हाला व्‍हॉट्सअॅपवरील टेस्‍टला हवा तो कलर देता येणार आहे. तसेच बॅकग्राउंड वॉलपेपरही ठेवता येणार आहे. फेसबुकमध्‍ये हे फिचर पूर्वीपासूनच आहे. आता व्‍हॉट्सअॅपमध्‍येही ते असणार आहेत.   
- युझर्स बॅकग्राउंडला शेअरही करु शकता. 

पुढील स्‍लाइडवर वाचा, स्‍टेटस फिचरही होणार अपडेट... 
 
बातम्या आणखी आहेत...