आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp चे 2 नवे फीचर्स लॉन्च, एकाचवेळी पाठवू शकता इतके Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- WhatsApp ने नुकतेच 2 नवे फीचर्स लॉन्च केले आहेत. यातील एक GiF शी निगडीत आहे, तर दूसरे WhatsApp वर फोटो सेंड करण्याच्या संदर्भात आहे. हे दोन्ही नवे फीचर्स आल्यानंतर GiF चे ऑप्शन emoji शेजारी दिसणार आहे.

WhatsAppअपडेट...
WhatsApp ने GiF अपडेटसाठी खुप वेळ घेतला. सुरुवातीला GiF सपोर्टचे फीचर लॉन्च करण्यात आले. यातून फोनमध्ये सेव्ह व्हिडिओची Gif फाइल बनउन युजर्स शेअर करु शकत आहेत. त्यानंतर फोनमध्ये सेव्ह असलेली Gif (जे कोणी सेन्ड केलेले असेल) शेअर करण्याचे फीचर लॉन्च करण्यात आले. आता WhatsApp ने Giphy च्या मध्यमातून Gif सर्च करण्याचे नवे फीचर लॉन्च केले आहे.

एकाचवेळी पाठवू शकता 30 फोटो
आता यूजर्सना WhatsApp द्वारे एकावेळी 30 फोटोज पाठवता येणार आहेत. व्हिडियोसाठीही असेच असेल.

हे फिचर्स केवळ बीटा यूजर्ससाठी
हे दोन्ही फीचर्स सध्या फक्त बीटा युजर्ससाठी लॉन्च करण्यात आले आहेत. परंतु लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी लागू करण्यात येणार आहेत. 

यापूर्वी लॉन्च करण्यात आले होते हे फिचर्स
काही दिवसांपुर्वी अॅन्ड्रॉइड युजर्ससाठी WhatsApp ने फ्रंट फेसिंग फ्लॅशचे फीचर लॉन्च केले होते. त्यात WhatsApp कॅमेऱ्यातून फोटो क्लिक कताच फ्लॅश लाइटचा इफेक्ट मिळत होता. ज्यांच्या फोनमध्ये फ्रंट फेसिंग फ्लॅश नाही त्यांच्यासाठी हे फिचर्स अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच काही दिवसांपुर्वी व्हिडिओ कॉलिंगचे फिचर देखील लॉन्च करण्यात आले होते.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...