आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉटसअॅप आता पूर्णपणे सुरक्षित, दोघांशिवाय कुणी पाहू शकणार नाही मेसेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लोकप्रिय मेसेजिंग सर्व्हिस व्हॉटस अॅपने युझर्ससाठी सर्वात महत्‍त्‍वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे व्हॉटस अॅपवरील तुमचे संदेश आता कुणीही हॅक करू शकणार नाही. एवढेच नाही तर दोन व्‍यक्‍तींशिवाय कोणीही हे मेसेज पाहू शकणार नाही. म्‍हणजे व्‍हॉट्स अॅप ग्राहकांसाठी पूर्णपणे सुरक्षित (इनक्रिप्टेड) झाले आहे.
दोनच व्‍यक्‍ती पाहू शकतील मेसेज..
- व्‍हॉट्स अॅपवरील मेसेज आता पाठवणारा आणि घेणारा दोघेच पाहू शकतील.
- याआधी व्हॉटसअॅप मेसेज सुरक्षा संस्‍था, हॅकर इंटरसेप्ट करू शकत होते.
- आता तुमच्‍या मेसेजच्‍या सुरक्षेसाठी कोड लावण्यात येईल.
- युझर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन व्हॉटस अॅपने हा निर्णय घेतला.
- व्हॉटस अॅपच्या सर्वात अपडेट वर्जनने कॉल मेसेज, फोटो, व्हिडीओ, फाईल, ऑडीओ
या कोडने सुरक्षित करण्यात आले आहे.
व्हॉट्सअॅपचे सह-संस्थापक काय म्‍हणाले..
- व्हॉट्सअॅपच्‍या सह-संस्थापकांनी इनक्रिप्टेड धोरणाबाबत माहिती दिली.
- सह-संस्‍थापक जेन कॉम आणि ब्रायन अॅक्टन यांनी ब्लॉग पोस्टमध्‍ये म्‍हटले की, या इनक्रिप्टेड मेसेजला कोणीच वाचू शकणार नाही.
- हॅकर्स आणि सायबर क्रिमिनल्सपासूनही आपली सुरक्षा होणार आहे.
- इनक्रिप्टेड धोरण अँड्रॉइड, आयफोन, ब्लॅकबेरी आणि विंडोज या सर्व
फोनसाठी लागू असणार आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, व्‍हॉट्सअॅपला का घ्‍यावा लागला असा निर्णय..
पुढे वाचा, काय आहे इनक्रिप्शन तंत्रज्ञान..