आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

iPhone यूजर्ससाठी आले Whatsappचे PC व्हर्जन, असे करेल काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
iphone युजर्ससाठी अखेर Whatsapp Web व्हर्जन लॉन्च झाले आहे. अॅंड्रॉइड यूजर्ससाठी आठ महिन्यांपूर्वी Whatsapp Web व्हर्जन सादर करण्‍यात आले होते.

VentureBeat च्या एका रिपोर्टनुसार, iphone युजर्ससाठी Whatsapp Web व्हर्जन लॉन्च झाले असले तरी ते सर्वच iphone यूजर्ससाठी उपयोगी पडणार नाही. काही युजर्सला काही काळ प्रतिक्षा करावी लागेल. कारण, सर्व यूजर्सपर्यंत रोलआउट पोहोचण्यासाठी अजून बराच कालावधी लागेल.

दरम्यान, अँड्रॉइड यूजर्ससाठी Whatsapp Web ची सुविधा करून देण्यात आली. iOS ऑपरेटिंग सिस्टमच्या लिमिटेशनमुळे त्याच्यासाठी स्वतंत्र Whatsapp Web व्हर्जन असेल, असे संबंधित कंपनीने आधीच स्पष्‍ट केले होते.
Whatsapp web चे नवे व्हर्जन मोबाइल व्हर्जनचे एक्सटेंशन आहे. यासाठी युजरला कोणतेही सॉफ्टवेअर पीसीमध्ये डाउनलोड करावे लागणार नाही. एका खास टेक्नॉलॉजीच्या मदतीने फोनमधील Whatsapp व्हर्जनची एक कॉपी कॉम्प्युटरमध्ये काम करेल. Whatsapp वरील सर्व मेसेज फोनवर लाइव्ह दिसतील. त्याचबरोबर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर दिसतील.
पुढील स्लाइडवर वाचा, Whatsapp Web च्या Steps...