आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Fastest Car Bloodhound Unveiled Can Go Up To 1600 Kmph

AMAZING: विमानापेक्षाही वेगात चालते ही कार, पापणी झपकताच होते नजरेआड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - पापणीची उघडझाप करण्‍याच्‍या वेळेत नरजेसमोरून गायब होणा-या कारची निर्मिती करण्‍यास यश आले असून, ती 1609kmph (1000mph) एवढ्या विराट गतीने अंतर कापते. तिला तयार करण्‍यासाठी संशोधकांना तब्‍बल आठ वर्षे मेहनत घ्‍यावी लागली असून, गुरुवारी लंडनमधील केनेरी वार्फमध्‍ये एका प्रशिदर्शनात नागरिकांना ती पाहता आली. संशोधकांनी तिला Bloodhound SSC असे दिले आहे. जमिनीवर सर्वात वेगाने धावणारी ती वस्‍तू म्‍हणून तिचा उल्‍लेख केला जात आहे.
या कारला रॉल्स रॉयस कंपनीचे EJ200 जेट इंजीन, सुपरचार्ज्ड जॅगुआर V8 इंजन आणि रॉकेट मोटर्स बसवलेले आहेत. कॅस्ट्रॉल आणि रोलेक्ससारख्‍या मोठ्या कंपन्‍यांनी या कारसाठी हायटेक फ्यूल आणि दूसरे इंस्ट्रूमेंट दिले आहेत. या कारचा अपघात झाला तर त्‍यातील व्‍यक्‍तींना इजा होऊ नये, यासाठी मल्टीपल कार्बन फायबरपासून तिचा सांगडा तयार करण्‍यात आलेला आहे.
विश्‍वविक्रम तोडण्‍याची तयारी
सध्‍या जगातील सर्वाधिक वेग असलेल्‍या कारची गती 1228 kmph (763mph) आहे. 1997 मध्‍ये Thrust SSC नावाच्‍या कारने हा विक्रम आपल्‍या नावावर केला होता. पुढील वर्षी दक्षिण आफ्रीकेत Bloodhound SSC ही नवीन कार हा विक्रम मोडण्‍याची तयारी करत आहेत.
हे आहेत वैशिष्‍ट्य
>13.5 मीटर लांब, 2 मीटर उंची टेल बॅलेंस करण्‍याची सुविधा
>135000 hp ची शक्‍ती, 180 फॉर्मूला वन कार एवढी शक्‍ती
>3 पद्धतीची ब्रेकिंग सिस्टम, 7 फायर एक्सटिंगिशर
>500 सेंसर्स कारची परफॉर्मेंस जाणून घेण्‍यासाठी
>350 पेक्षा जास्‍त कंपन्‍या, यूनिवर्सिटीज यांनी ती विकसित केली.

पुढील स्लाइड्सवर पाहा कारचे फोटोज...