आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत जगातील पहिली थ्रीडी कार, जाणून घ्‍या वैशिष्‍ट्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - जगातील पहिली थ्रीडी कार तयार करण्याची योजना अमेरिकेने आखली आहे. या कारचा प्रत्येक भाग थ्रीडी तंत्राने तयार करण्यात येणार असून गुगलच्या सेल्फ ड्रायव्हिंग कारपेक्षा ही कार आकाराने छोटी असेल. मात्र, कारचा वेग विमानासारखा असेल. या कारला ‘द ब्लेड’ असे नाव देण्यात आले असून फ्रान्सिस्कोच्या डायव्हरजेट मायक्रो फॅक्टरीमध्ये ही कार तयार हाेत आहे. पर्यावरणपूरकही कार पर्यावरणपूरक असून मुळातच प्रदूषण कमी करणे हा या कार निर्मितीमागे प्रमुख उद्देश असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कारचे वजनही अत्यंत कमी असेल. त्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही अत्यंत कमी असेल.फेरारी आिण लॅम्बोर्गिनीसारख्या कारपेक्षा या कारचा वेग अिधक असणार आहे.
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या या कारचे वैशिष्‍ट्ये...